पुरंदर तालुक्यात कुख्यात गुंड गणेश रासकरवर गोळीबार, जागेवरच मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे जिल्ह्यात दहशत माजवणारा गुंड गणेश रासकरवर शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजल्याच्या दरम्यान अज्ञातांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात गणेशचा जागेवरच मृत्यू झाला आहे. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ही घटना घडली असून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

ADVERTISEMENT

गणेश रासकवर अनेक गुन्हे दाखल होते. खंडणी, व्यापाऱ्यांना धमकी देणे, मारामारी अशा अनेक गुन्ह्यांअंतर्गत गणेशवर याआधी कारवाई झाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजल्याच्या दरम्यान गणेश रासकर आपल्या पल्सर गाडीवर पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील एस.टी. स्टँड परिसरात आला होता.

याच परिसरात त्याच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. अज्ञात व्यक्तींनी गणेशवर पाठीमागून दोन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गणेशच्या डोक्याच्या मागच्या भागाला गंभीर जखम झाली. नीरा येथील प्राथमिक उपचार केंद्रात गणेशला दाखल करण्यात आलं परंतू त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT