Omicron Variant : धारावीतील नागरिक निघाला ‘ओमिक्रॉन’ पॉझिटिव्ह!
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेला मुंबईतील पहिला रुग्ण बरा झाल्यामुळे दिलासादायक परिस्थिती असताना महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत ओमिक्रॉन व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. टांझानियातून परतलेली एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 24 नोव्हेंबरला मुंबईत ओमिक्रॉन व्हेरिएंचा पहिला रुग्ण आढळून आला होता. हा रुग्ण बरा झाला असून, […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेला मुंबईतील पहिला रुग्ण बरा झाल्यामुळे दिलासादायक परिस्थिती असताना महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे. मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत ओमिक्रॉन व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. टांझानियातून परतलेली एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
24 नोव्हेंबरला मुंबईत ओमिक्रॉन व्हेरिएंचा पहिला रुग्ण आढळून आला होता. हा रुग्ण बरा झाला असून, त्याला डिस्चार्जही देण्यात आला आहे. त्यानंतर आता मुंबईत आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. महत्त्वाचं म्हणजे दाट लोकवस्ती असलेल्या धारावीत हा रुग्ण आढळून आला आहे.
49 वर्षीय व्यक्ती मूळची चेन्नई येथील असून, मागील काही वर्षांपासून धारावीत राहते. 4 डिसेंबर रोजी ही व्यक्ती टांझानियातून मुंबईत आली. विमानतळावरच या व्यक्तीच्या आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
मुंबई-पुण्याला दिलासा! ‘ओमिक्रॉन’ची लागण झालेल्या पहिल्या रुग्णांचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’