नागपूर, ठाण्याचे हरुन-अल-रशीद; संजय राऊतांची फडणवीस-शिंदेंवर टीका, अमृता फडणवीसांचे मानले आभार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात अस्तित्वात आलंय. नवं सरकार आलं असलं, तरी शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटातील संघर्ष थांबलेला नाही. शिवनेतील बंडखोरीत भाजपचाही सहभाग होता, यावरून बरंच रणकंदन सुरू झालं आहे. त्यावरूनच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना हरुन अल रशीद यांची उपमा देत लक्ष्य केलंय. […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात अस्तित्वात आलंय. नवं सरकार आलं असलं, तरी शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटातील संघर्ष थांबलेला नाही. शिवनेतील बंडखोरीत भाजपचाही सहभाग होता, यावरून बरंच रणकंदन सुरू झालं आहे. त्यावरूनच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना हरुन अल रशीद यांची उपमा देत लक्ष्य केलंय.
खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून देवेंद्र फडणवीस यांच्या वेषांतर करून भेटीगाठींवर भाष्य केलंय. “एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केले, त्याच्याशी भाजपचा संबंध नाही असे सांगणारे भाजपवाले उघडे पडले. शिंदे यांनीच पडद्यामागचे सारे कारस्थान विधानसभेत फोडले व आता अमृता फडणवीस यांनीच घरातले गुपित फोडले. ‘या सर्व काळात देवेंद्र फडणवीस हे रात्री-अपरात्री वेषांतर करून शिंदे यांना भेटण्यासाठी बाहेर पडत.’ काळा कोट, काळा चष्मा, फेल्ट हॅट असे जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स पद्धतीचे वेषांतर करून ते बाहेर पडत असावेत. त्यांच्या तोंडात चिरूट वगैरे आणि हातात नक्षीदार काठी होती काय? याचाही खुलासा व्हायला हवा,” असा मिश्किल टोला राऊतांनी लगावलाय.
एकनाथ शिंदेंच्या धावत्या भेटीत युवासेनेला धक्का, महाराष्ट्र सहसंघटक उद्या देणार राजीनामा
“पंतप्रधान मोदी हे कपड्यांचे व रूप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत, पण फडणवीसही तेच करू लागले. त्यांनी शिंदे यांना भेटायला जाताना काही वेळेस नकली दाढी-मिश्याही लावल्या असाव्यात. हे सर्व रहस्य त्यांच्या पत्नी अमृता यांनी फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती. फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. मोदी यांचे अनुकरण त्यांच्या लोकांनी किती करावे ते पहा. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सत्तांतर घडवून आणण्यासाठी जे वेषांतर केले ते सर्व कपडे व ऐवज पुढील पिढीसाठी एखाद्या संग्रहालयातच ठेवले पाहिजेत,” असं राऊत म्हणाले आहेत.










