एकनाथ शिंदेंवर शिवसेनेची मोठी कारवाई, केसरकर म्हणतात उद्धव ठाकरेंना उत्तर देणार
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला आम्ही उत्तर देणार नाही. त्यांच्या वक्तव्यावर उत्तर द्यायचं की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेतील. त्यांनी सांगितल्यावरच आम्ही उत्तर देऊ. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच. नाती जपण्यात जी गोडी आहे ती राजकारणात नाही असं शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. […]
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला आम्ही उत्तर देणार नाही. त्यांच्या वक्तव्यावर उत्तर द्यायचं की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेतील. त्यांनी सांगितल्यावरच आम्ही उत्तर देऊ. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच. नाती जपण्यात जी गोडी आहे ती राजकारणात नाही असं शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी गोव्यात आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. एकनाथ शिंदे यांना पक्षातून तसंच शिवसेनेतल्या सर्व पदांवरून काढण्यात आलं आहे. याबाबत विचारलं असता दीपक केसरकर म्हणाले की शिंदे यांच्या विरोधात केलेली ही कारवाई शिवसेनेला शोभणारी नाही. ही कारवाईला लोकशाहीला शोभणारी नाही. याबाबत आम्ही त्यांना रितसर उत्तर देऊ.
एकनाथ शिंदे यांनी २१ जूनला बंड पुकारलं त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करत त्यांना सगळ्या पदांवरून हटवलं. तर पक्षातूनही त्यांची हकालपट्टी केली आहे. मात्र आता या सगळ्याबाबत आम्ही रिसतर उत्तर देऊ असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्यावर जी कारवाई करणारं पत्र पाठवण्यात आलं आहे ते पत्र बेकायदेशीर आहे. यावर कायदेशीर उत्तर दिलं जाईल. त्यानंतरही त्यांनी ऐकलं नाही तर पुढची भूमिका घेऊ. सभागृहाच्या नेत्याचा अपमान होतो जेव्हा हक्कभंग येतो. इतकं हे पद महत्त्वाचं आहे, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.
आमचा जो काही लढा आहे तो महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे. देवेंद्र फडणवीस हे आमच्या मंत्रिमंडळात आल्याने आमची ताकद वाढली आहे. भाजप आणि शिवसेनेची मनं जुळणं खूप गरजेचं आहे. एकनाथ शिंदे हे आता राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास नक्की होईल असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत आणि ते स्वयंपूर्ण झाले पाहिजेत यासाठी हे सरकार नक्की प्रयत्नशील असणार आहे असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेने जी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे त्यावर विचारलं असता दीपक केसरकर म्हणाले की २० रूपयांचा वडापाव खाणाऱ्यांना १०० रूपयांचं प्रतिज्ञापत्र का? पक्षात राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र नाही तर प्रेमाचं बंधन हवं, शिवबंधन हे प्रेमाचं बंधन आहे असं केसरकर म्हणाले. आम्ही शिवबंधन आज सुद्धा घालतो. शिवबंधन बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून आमच्या हातावर आहे, आम्ही खरे शिवसैनिक आहोत असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT