Shraddha Murder : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे लपवले फ्रीजमध्ये, गर्लफ्रेंडला घेऊन आला घरी; आफताबने काय सांगितलं?
श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाबद्दल नवीन माहिती समोर आलीये. पोलीस चौकशीत त्याने गुन्ह्यांची कबूली देताना धक्कादायक माहिती दिलीये. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब नवीन मुलीला डेट करत होता. तो तिलाही घरी घेऊन येत होता, असंही चौकशीतून समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिचा बॉयफ्रेंड आफताब अमीन पूनावाला याला अटक केलीये. त्याची सध्या […]
ADVERTISEMENT

श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाबद्दल नवीन माहिती समोर आलीये. पोलीस चौकशीत त्याने गुन्ह्यांची कबूली देताना धक्कादायक माहिती दिलीये. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब नवीन मुलीला डेट करत होता. तो तिलाही घरी घेऊन येत होता, असंही चौकशीतून समोर आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिचा बॉयफ्रेंड आफताब अमीन पूनावाला याला अटक केलीये. त्याची सध्या चौकशी सुरू असून, त्याने श्रद्धाची हत्या केल्याची कबूली दिलीये.
श्रद्धाची हत्या केल्यानंतर डेटिंग करत होतो आणि मुलीला घरीही घेऊन आलो होतो, अशी माहितीही त्याने पोलीस चौकशीत दिलीये. आफताब पूनावाला ज्या मुलीला डेट करत होता आणि घरी घेऊन आला होता, मानसोपचार तज्ज्ञ होती, असंही सूत्रांनी सांगितलं.
shraddha walker Murder :”मला वाचवा, नाहीतर तो मारून टाकेल”, श्रद्धाच्या मदतीला मित्रही धावले, पण…