बापानं ‘ती’ गोष्ट खरी केलीच, दोन चिमुकल्यांची हत्या करत स्वत: संपवलं जीवन
विकास राजूरकर, प्रतिनिधी, चंद्रपूर महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात हृहय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बापानेच आपल्या दोन मुलांची विष देऊन हत्या केली आहे. वडिलांनी मानसिक तणाव आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून हे कृत्य केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांनी स्वत: आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं आहे. घटनास्थळावर एक चिठ्ठी देखील सापडली आहे त्यामध्ये या सर्व गोष्टी समोर […]
ADVERTISEMENT

विकास राजूरकर, प्रतिनिधी, चंद्रपूर
महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात हृहय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बापानेच आपल्या दोन मुलांची विष देऊन हत्या केली आहे. वडिलांनी मानसिक तणाव आणि आर्थिक विवंचनेला कंटाळून हे कृत्य केलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांनी स्वत: आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं आहे. घटनास्थळावर एक चिठ्ठी देखील सापडली आहे त्यामध्ये या सर्व गोष्टी समोर आल्या आहेत.
आर्थिक विवंचनेतून संपवलं चिमुकल्यांचं जीवन
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात शरीर सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. वरोरा तालुक्यातील बोर्डा गावात एका बापाने आपल्या दोन निष्पाप मुलांची विष पाजून हत्या केली, त्यानंतर बाप वर्धा येथे घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. 3 वर्षांची मुलगी मिष्टी कांबळे, 6 वर्षीय मुलगा सुमित कांबळे असं मृताचं नाव आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी वडिलांनी आर्थिक आणि मानसिक तणावाखाली ही घटना घडवली आहे, मुलांची नीट काळजी न घेतल्याने तो अनेकदा मुलांना मारल्याचीही चर्चा होती.
आरोपी वडील संजय कांबळे हे आर्थिक विवंचनेमुळे मानसिक तणावात राहायचे. ते खाजगी शिकवणी वर्ग चालवायचे. मात्र त्यांच्या मानसिक तणावामुळं मुलं शिकवणीत कमी शिकायला येऊ लागली, त्यामुळे पैसे मिळणं कमी झालं. त्यामुळं घर चालवणं कठीण झाले होते, अशा परिस्थितीत तो आणखीनच मानसिक तणावात राहू लागला. वडील संजयने आपल्या दोन निष्पाप मुलांना अत्यंत निर्दयीपणे विष देऊन ठार मारले, आणि घराला कुलूप लावले. त्यानंतर घटनास्थळावरून फरार झाला.
वडिलांनीही विष पिऊन संपवलं जीवन
आज सकाळी आरोपी वडिलांचा मृतदेह वर्धा जिल्ह्यातील गिरड जवळील शेतात सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मृत संजयकडून सुसाईड नोट सापडली आहे. ज्यात लिहिले आहे की, मुलांची नीट काळजी न घेतल्याने त्याने मुलांची हत्या केली, काही दिवसांपूर्वी संजयने कुटुंबियांसमोर सांगितले होते की, मी माझ्या मुलांची नीट काळजी घेऊ शकत नाही, त्यामुळं मला त्यांना मारावं लागेल, कुटुंबीयांनी ते हलक्यात घेतले, त्यांना काय माहित की बाप इतका क्रूर निघेल.
घटनेच्या वेळी मुलांची आई कुठं होती?
घटनेच्या वेळी मुलांची आई कामावर गेली होती, ती एका महाविद्यालयात शिकवते. आई घरी परतली तेव्हा दोन्ही मुलं बेडवर निर्जीव पडलेली होती, त्यांच्या तोंडातून फेस येत होता, हे दृश्य पाहून आईला धक्का बसला. आईनं आरडाओरडा करुन आजूबाजूच्या लोकांना बोलावलं आणि मुलांना तात्काळ रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी मुलांना मृत घोषित केले.