Lok Sabha 2024 : भाजपचं ‘खेला होबे’! शिंदे, पवारांनंतर आणखी तीन नेते ‘एनडीए’त
मविआची राजकीय ताकद कायम असल्याचे सर्व्हेमध्ये दिसून आल्यानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट सोबत करत धक्का दिला. तसंच देशातही विरोधकांना धक्के देण्यास भाजपने सुरूवात केली आहे.
ADVERTISEMENT

Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. भाजपप्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित यूपीएने निवडणुकीच्या रणनीती काम करण्यास सुरूवात केली आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधकांची एकजूट सुरू असतानाच भाजपने मोठा धक्का दिला आहे. भाजपने गेल्या काही दिवसांत राजकीयदृष्ट्या धक्कादायक निर्णय घेतले आहेत.
महाराष्ट्रासह देशात दुरावलेल्या मित्रांना महायुतीत सामावून घेण्याची मिशन भाजपने हाती घेतलं असून, एनडीएमध्ये नवे पक्ष सामील झाल्याने दुरावलेल्या मित्रांच्या पुनरागमनाचीही चर्चा सुरू आहे. त्याचा परिणाम कर्नाटकपासून आंध्र प्रदेशपर्यंत आणि उत्तर प्रदेशपासून बिहारपर्यंत दिसून येत आहे. जाणून घेऊया 2024 च्या निवडणुकीत भाजपचा प्लॅन काय आहे?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं आव्हान निर्माण झाल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सोबत घेतले. तरीही मविआची राजकीय ताकद कायम असल्याचे सर्व्हेमध्ये दिसून आल्यानंतर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट सोबत करत धक्का दिला. तसंच देशातही विरोधकांना धक्के देण्यास भाजपने सुरूवात केली आहे.
वाचा >> NCP : अजित पवार गटाचा शरद पवारांच्या मनधरणीचा प्रयत्न पुन्हा अयशस्वी
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 18 जुलै रोजी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये एनडीएची बैठक बोलावली आहे. यामध्ये त्या सर्व पक्षांना येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे, जे 2024 च्या निवडणुकीत भाजपसोबत असतील. यामध्ये जुने मित्र जितनराम मांझी, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह, ओम प्रकाश राजभर यांच्या नावांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारही पहिल्यांदाच एनडीएच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. देवेगौडा यांचा पक्ष जेडीएसही आगामी काळात एनडीएमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.