बंडाच्या चर्चेवर अजित पवारांनी उद्धव ठाकरेंसमोरच सांगितला प्लॅन
अजित पवारांनी नंतर बंडाच्या चर्चा फेटाळल्या. त्यामुळे मुंबईतील सभेत तरी अजित पवार बोलणार का आणि बोलले तर बंडाबद्दल, महाविकास आघाडीबद्दल काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
ADVERTISEMENT

अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा आणि बंडाच्या बातम्यांवरून पंधरा दिवस चांगलाच गदारोळ झाला. नागपूरमधील वज्रमूठ सभा ते मुंबईतील सभेपर्यत महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार की नाही याबद्दलही उलटसुलट बोललं गेलं. याच सगळ्या पार्श्वभूमीवर 1 मे रोजी मुंबई मविआची सभा झाली. या सभेत अजित पवारांनी बंडाच्या चर्चेबद्दल ठाकरेंसमोरच थेट भाष्य केलं. अजित पवार नेमकं काय म्हणाले?
महाविकास आघाडीच्या नागपूरमधील वज्रमूठ सभेत अजित पवारांनी भाषण केलं नाही. बंडाच्या तयारीत असल्यामुळे अजित पवारांनी भाषण टाळल्याचं त्यावेळी म्हटलं गेलं. पण अजित पवारांनी नंतर बंडाच्या चर्चा फेटाळल्या. त्यामुळे मुंबईतील सभेत तरी अजित पवार बोलणार का आणि बोलले तर बंडाबद्दल, महाविकास आघाडीबद्दल काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
हेही वाचा >> “टिल्ली, टिल्ली लोकं पण बोलायला लागली…” : अजित पवारांनी कोणाला फटकारलं?
यासोबतच महाविकास आघाडीचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर अजित पवार बंडाच्या चर्चेविषयी काय बोलतात याबद्दलही राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं. याच सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार मविआ मुंबई सभेला आले. सर्वांची भाषणं ऐकली. संजय राऊतांनी केलेलं तोंडभरून कौतुकही लक्ष देऊन ऐकलं आणि पवार बोलले. 17 मिनिटांच्या भाषणात बंडाच्या चर्चेचाही ओझरता उल्लेख केला. नेमकं काय म्हणाले, ते तुम्हीच बघा.
अजित पवार बंडाच्या चर्चेबद्दल वज्रमूठ सभेत काय बोलले?
बीकेसी मैदानात झालेल्या वज्रमूठ सभेत बोलताना अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याच्या आलेल्या बातम्या आणि चर्चांवर स्पष्ट भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, “अलीकडच्या काळात न विचारताच कुणी काहींना काही बातम्या देत असतं. त्याच्यामुळे कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता संभ्रमावस्थेत राहते. त्या गोष्टीवरही विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही. अशा प्रकारची विनंती या वज्रमूठ मेळाव्याच्या निमित्ताने, सभेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांना करतो”, असं अजित पवार या सभेत बोलले.










