Ajit Pawar: मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रचंड मोठी घोषणा, अजितदादांना मोठा धक्का?
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच काय राहणार आहे. ती गोष्ट मी आणि अजित पवार यांनी स्वीकारली आहे. असं मोठं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असल्याचं सध्या मानलं जात आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Politics Latest News: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती की, एकनाथ शिंदेंना बाजूला सारून भाजप अजित पवारांना मुख्यमंत्री पद देऊ करेल. मात्र, आता याचबाबत भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मोठं विधान केलं आहे. ते देखील जाहीररित्या त्या माध्यमांसमोर. विधानसभा परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महायुतीचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहणार!
पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:
‘कोणत्याही पक्षातील लोकांना वाटणं की, आपल्या पक्षाचे नेते हे मुख्यमंत्री झाले पाहिजे यात वावगं काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला वाटू शकतं की, त्यांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. आमच्या पक्षातील लोकांना वाटू शकतं की, भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र, मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो की, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री याठिकाणी होणार नाही. मुख्यमंत्री पदात कोणताही बदल होणार नाही. या संदर्भात अजित पवार आणि मी आमच्या दोघांच्या मनात पूर्ण स्पष्टता आहे.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहतील…’
‘ज्यावेळी महायुतीची चर्चा झाली त्यावेळेसही अजितदादांना अतिशय स्पष्टपणे याची कल्पना देण्यात आली आहे आणि ती त्यांनी स्वीकारली देखील आहे. केवळ स्वीकारलीच नाही. तर त्यांनी स्वत: आपल्या वक्तव्यात हे स्पष्टपणे सांगितलं आहे की, मुख्यमंत्री बदलाची चर्चा देखील नाही. जे आमच्या महायुतीतील लोकं अशाप्रकारचं वक्तव्य करत आहेत त्यांना माझं अतिशय स्पष्टपणे सांगणं आहे की, अशाप्रकारेच संकेत देणं किमान संभ्रम पसरवणं त्यांनी तात्काळ बंद केलं पाहिजे. कारण यातून महायुतीच्या संदर्भात संभ्रम निर्माण होतो. नेत्यांच्या मनात संभ्रम नाही. शिंदे साहेबच मुख्यमंत्री आहेत तेच मुख्यमंत्री राहणार आहेत.’ असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा >> Afzal Guru ला फाशी देताच जेलर ढसाढसा रडला, कधीही समोर न आलेला ‘हा’ किस्सा जरूर वाचा!
‘दहा तारखेला काहीही होणार नाही… झालंच तर..’
‘यामुळे कार्यकर्त्यांनीही संभ्रम ठेवण्याचं कारण नाही. आता पृथ्वीराज बाबा जे काही बोलले ते अशाप्रकारची पतंगबाजी सध्या अनेक लोकं करत आहेत. अनेक लोकं राजकीय भविष्यवेत्ते झाले आहेत. पण त्यांनी कितीही भविष्य सांगून आमच्या युतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही मी अतिशय स्पष्टपणे आणि पूर्ण अधिकृतपणे सांगतो की, दहा तारखेला काही होणार नाही, अकरा तारखेला काही होणार नाही.. झालंच काही तर आमचा विस्तार होणार आहे. त्याची तारीख ठरायची आहे.’ असंही फडणवीस म्हणाले.