Exclusive Interview: भारताला विकसित करण्यासाठी PM मोदींचा खास मंत्र, म्हणाले GYAN…
PM Narendra Modi Exclusive Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया टुडेचे मुख्य संपादक आणि अध्यक्ष अरुण पुरी, उपाध्यक्ष कली पुरी आणि समूह संपादकीय संचालक राज चेंगप्पा यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्याचे सूत्रही सांगितले.
ADVERTISEMENT

PM Narendra Modi Exclusive Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. इंडिया टुडेचे मुख्य संपादक आणि अध्यक्ष अरुण पुरी, उपाध्यक्ष कली पुरी आणि समूह संपादकीय संचालक राज चेंगप्पा यांच्याशी झालेल्या विशेष संभाषणात, पंतप्रधानांनी त्यांचा संकल्प पूर्ण करण्याचे सूत्र देखील स्पष्ट केले. ‘GYAN पर ध्यान, GYAN को सम्मान’ या सूत्रानेच भारत विकसित होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आपला हा फॉर्म्यूला डीकोड करताना पंतप्रधानांनी सांगितले की, ‘येथे GYAN मध्ये G म्हणजे गरीब, Y म्हणजे तरुण, A म्हणजे अन्नदाता म्हणजेच शेतकरी आणि N म्हणजे नारी अर्थात महिला.’ (focus on gyan respect for gyan pm modi explained his formula for developed india)
PM मोदींनी दिला विकासाचा नवा मंत्र
पीएम मोदी म्हणाले की, ‘जर आपण बारकाईने पाहिले तर आजच्या काळात ऐतिहासिक साम्य आहे. शंभर वर्षांपूर्वी स्वातंत्र्याची आशा होती. 1922 ते 1947 या काळात प्रत्येकाला स्वातंत्र्य चळवळीत हातभार लावायचा होता. काहींनी खादी कातून हातभार लावला, काहींनी विविध चळवळींमध्ये भाग घेऊन, जमेल त्या पद्धतीने योगदान दिले.’
‘पुढील 25 वर्षे देशासाठी महत्त्वाची आहेत. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होईपर्यंत भारताला विकसित देश बनवण्याची आशा आणि अपेक्षा मला लोकांमध्ये दिसत आहे. हीच ऊर्जा माझी प्रेरणा आहे. आज भारताला लोकसंख्येचा फायदा आहे. हा लाभ उत्पादकता आणि आर्थिक वाढीमध्ये बदलला पाहिजे.’