CM Eknath Shinde:’…तसा आदेश कसा दिला जाऊ शकतो’; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं
CM Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.सरकारमुळे लाठीचार्ज केला गेला या विरोधकांच्या आरोपांवर त्यांनी सडतोड असं उत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT

CM Eknath Shinde: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतील आंदोलनामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून विरोधकांनी आंदोलनाअडून राजकारण करण्याचे काम केले असल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे. (how order lathicharge on maratha kranti morcha movement in Jalanya)
संबंधितांची उच्चस्तरिय बैठक
एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की, आंदोलनावर लाठीहल्ला झाल्यानंतर संबंधितांची उच्चस्तरिय बैठक घेण्यात आली. त्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांना शब्दही दिला होता. त्यामुळे तुमच्या मागणीवर गांभीर्याने विचार करतो आहे असंही एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
हे ही वाचा>>
कायदा सुव्यवस्था अबाधित
महाराष्ट्रात याआधी 58 मोर्चे निघाले आहेत.मात्र यावेळी कोणतीही कायदा सुव्यवस्था बिघडली नाही तर ती अबाधित राहिली. मात्र यावेळी आंदोलनाच्या आडून राज्याचं वातावरण व शांतता बिघडवण्याचं काम विरोधकांकडून केले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
संबंधितांची उच्चस्तरिय बैठक
आंदोलनाच्या आडून शांतता बिघडवली
अंतरवाली सराटीतील मराठा मोर्चाच्या आंदोलनानंतर राज्यातील परिस्थिती बिघडवण्याचं काम विरोधकांनी केले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्याबरोबर चर्चा करुन मराठा आंदोलनाचा विषय सोडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र विरोधकांनी हे आंदोलन पेटवण्याचं काम केले आहे. आंदोलनाच्या आडून शांतता बिघडवण्याचं काम राज्यातील विरोधकांनी केली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.










