देवेंद्र फडणवीसांचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ सर्व्हेमध्ये नेमकं काय?

राहुल गायकवाड

नुकताच ‘झी न्यूज आणि मॅटराईझ’ या संस्थेने सर्वे केला. त्यात जर आत्ता निवडणुका झाल्या, तर राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार बहुमताने घरवापसी करेल, असा म्हटलं गेलं आहे.

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis, Maharashtra Opinion Poll 2023 : NDA is likely to get 46 per cent of votes and MVA's vote share will be 35 per cent if elections are held today.
Devendra Fadnavis, Maharashtra Opinion Poll 2023 : NDA is likely to get 46 per cent of votes and MVA's vote share will be 35 per cent if elections are held today.
social share
google news

Maharashtra politics : लोकसभा, विधानसभा निवडणुकांना एक वर्ष राहिलेलं असताना आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. विविध संस्थांकडून सध्या सर्वे करण्यात येत असून, मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न यातून करण्यात येत आहे. नुकताच ‘झी न्यूज आणि मॅटराईझ’ या संस्थेने सर्वे केला. त्यात जर आत्ता निवडणुका झाल्या, तर राज्यात पुन्हा शिंदे-फडणवीस सरकार बहुमताने घरवापसी करेल, असा म्हटलं गेलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना बघायला जास्त आवडेल, असा कौल दिला गेला आहे. (Maharashtra Politics news : Who Will Win If Assembly Elections Are Held Today?)

गेल्या काही काळामध्ये आलेल्या सर्वेमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढल्यास त्याचा फायदा होऊ शकतो असं समोर आलं होतं. परंतु ‘झी न्यूज’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मतदारांचा कौल शिंदे फडणवीस सरकारच्या दिशेने दिसत आहे.

हेही वाचा >> Chavadi Impact: संजय राऊत म्हणाले शिवसेना शाहांनी फोडली, गृहमंत्री म्हणाले सेना तर…

36 हजार लोकांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला होता. 23 मे ते 11 जून या कालावधीमध्ये हा सर्वे करण्यात आला असल्याचं ‘झी’ कडून सांगण्यात आलं आहे.

पुन्हा मुख्यमंत्री शिंदेंच हवेत…

मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांना 26 टक्के पसंती देण्यात आली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना 23 टक्के पसंती मिळाली आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना 11 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. अशोक चव्हाणांना 9 टक्के, तर अजित पवारांना 7 टक्के व तर इतरांना 24 टक्के पसंती देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp