Uddhav Thackeray : ‘मविआ’वरच प्रश्नचिन्ह! ठाकरेंसमोरच संजय राऊतांचा काँग्रेस, राष्ट्रवादीला इशारा!

भागवत हिरेकर

संजय राऊतांनी महाविकास आघाडीत राहण्याबद्दल असं भाष्य केलं की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. संजय राऊतांचं हे विधान म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या मित्रपक्षांना अप्रत्यक्षपणे इशारा असल्याचंही बोललं जात आहे.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray : MVA Sanjay Raut big statement and ajit pawar Reaction.
Uddhav Thackeray : MVA Sanjay Raut big statement and ajit pawar Reaction.
social share
google news

Maharashta politics : Sanjay Raut Vs Ajit Pawar : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं चाललंय काय? असा प्रश्न शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे उपस्थित होऊ लागला आहे. आधीच जागावाटपावरून मविआती तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याच्या वृत्तांनंतर संजय राऊतांनी महाविकास आघाडीत राहण्याबद्दल असं भाष्य केलं की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. संजय राऊतांचं हे विधान म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या मित्रपक्षांना अप्रत्यक्षपणे इशारा असल्याचंही बोललं जात आहे.

शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी शिबीर पार पडलं. या शिबिरात खासदार संजय राऊतांनी शिवसैनिकांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी जोरदार भाषण केलं. पण, भाषण करताना संजय राऊतांनी भावी मुख्यमंत्री पदाच्या जाहिरातीवर भाष्य करताना महाविकास आघाडी राहण्याबद्दल एक विधान केलं.

संजय राऊत काय म्हणाले?

“सध्या महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्र्यांचं फार पिक आलेय उद्धवजी. पहावं तिकडे भावी मुख्यमंत्री… आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत. राहू… जोपर्यंत आपली इच्छा आहे, तोपर्यंत! हे काही आमच्या इच्छेवर नाहीये. हे राजकारण आहे. पण, आपण पाहतोय की, भावी मुख्यमंत्री… भावी मुख्यमंत्री. अरे बाबानों, अजूनही विद्यमान मुख्यमंत्री समोर बसलेले आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> “…म्हणून उद्धव ठाकरेंचे दुकान बंद पाडलं”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण

एकीकडे महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीप्रमाणेच देशभरात विरोधी बाकावरील पक्षाची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ही एकजूट होणे कसे गरजेचे आहे, याबद्दल शिबिरात सांगितले. पण, संजय राऊतांना नेमकं म्हणायचं काय? याचे वेगवेगळे अर्थ आता लावले जाऊ लागले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp