Sharad Pawar : अजित पवारांचा पुतण्या पवार कुटुंबाला पुन्हा एकत्र आणणार?
युगेंद्र यांनी पवारांची घेतलेली भेट नेहमीप्रमाणेच होती असं म्हंटलं असलं तरी राष्ट्रवादीच्या फुटीमध्ये त्यांनी केलेले ट्विट खूप काही सांगून जातात, अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर युगेंद्र यांनी ट्विट करत अजितदादांचं अभिनंदन केलं होतं.
ADVERTISEMENT

Ncp Sharad Pawar Ajit pawar : राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आता पवार कुटुंबात देखील फूट पडल्याचं चित्र आहे. अजित पवारांनी सत्तेत सहभागी झाल्यानतंर केलेल्या भाषणामध्ये शरद पवारांवरच निषाणा साधला, त्यामुळे या राजकीय भूकंपामुळे पवार कुटुंबातच कलह निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत.
अशातच मंगळवारी (12 जुलै) अजित पवार पवारांनी त्यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांची भेट घेतली, तर दुसरीकडे श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली.
शरद पवार विरुद्ध अजित पवार, 2019 मध्ये काय घडलं होतं.
2019 मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानतंर अजित पवार श्रीनिवास पवार यांच्याकडेच थांबले होते. त्यानतंर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात श्रीनिवास पवार यांनी मध्यस्ती केली होती, असं नंतर म्हटलं गेलं. आता पुन्हा पक्षात फूट पडलेली असताना श्रीनिवास पवार यांचे पुत्र आणि अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे युगेंद्र पवार नेमके कोण आहेत हे समजावून घेणं महत्त्वाचं ठरतं.
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर युगेंद्र यांनी एकोनॉमिक टाईम्सला प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये ते म्हणाले, ‘शरद पवारांची वयक्तिक कामासाठी भेट घेतली. मी माझ्या आजोबांना अनेकदा भेटतो.’