'मोदींच्या मंत्रिमंडळात मला स्थान मिळाले तर...'; केंद्रातल्या मंत्रिपदावर सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'मी संधीचा पुरेपूर फायदा घेईन'

point

बारामतीतील पराभवावर सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? 

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राष्ट्रवादीकडून राज्यसभेचा अर्ज भरला आहे. बारामती लोकसभेतून पराभव झाल्यानंतर प्रफुल पटेलांच्या रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर बारामतीत सुनेत्रा पवारांना केंद्रीय मंत्रीपद देण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवार पुण्यात आल्या असता त्यांनी यावर भाष्य केले. 'केंद्रीय मंत्रिपरिषदेत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव स्वीकारण्यास त्यांना आनंद होईल आणि त्या संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करतील', असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे. (ajit pawar ncp sunetra pawar says if i get central ministry post in modi cabinet i will accept it)

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांचा नणंद आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला होता. पण, गुरूवारी (13 जून) राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून त्यांनी मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या रिंगणात एकमेव उमेदवार असल्याने सुनेत्रा पवार यांची संसदेच्या वरिष्ठ सभागृहात बिनविरोध निवड होणे निश्चित आहे.

हेही वाचा : Maharashtra Vidhan Sabha : ठाकरेंचा मोठा प्लॅन! स्वतंत्र लढण्याची तयारी! Inside Story

'मी संधीचा पुरेपूर फायदा घेईन'

पुण्यात पोहोचल्यावर स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे जंगी स्वागत केले. केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्याची ऑफर स्वीकारणार का, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता, त्या म्हणाल्या, 'जर संधी मिळाली तर मी नक्कीच या संधीचा लाभ घेईन.'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : खासदार बाळ्या मामांचा एक फोन अन् थेट कलेक्टरचा आदेश..

 

भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) सध्या केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये कोणतेही प्रतिनिधित्व नाही. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा नव्या एनडीए सरकारमध्ये स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री म्हणून समावेश करण्याचा भाजपचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळला होता.

हेही वाचा : RSS: मोहन भागवत घेणार 'या' बड्या नेत्याची भेट, या भेटीचा अर्थ काय?

 

बारामतीतील पराभवावर सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? 

"पवार घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करताना जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला, मात्र शेवटी मतदारांचाच निर्णय मान्य करावा लागेल. प्रत्यक्षात काय घडले हे शोधण्यासाठी आम्ही (बारामतीतील पराभव) आत्मपरीक्षण करत आहोत आणि विश्लेषणानंतर सुधारात्मक उपाययोजना केल्या जातील." असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. तसंच सुनेत्रा पवार यांनी त्यांना राज्यसभेत प्रवेशाची संधी दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचे आभारही मानले.

ADVERTISEMENT


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT