Narayan Rane थेट म्हणाले, 'कोकणातून मी शिवसेना संपवली..' नेमकं कोणाला डिवचलं?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

 'कोकणातून मी शिवसेना संपवली..' वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
'कोकणातून मी शिवसेना संपवली..' वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
social share
google news

Narayan Rane Konkan: सिंधुदुर्ग: भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी आज (15 जून) कोकणात घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक अत्यंत मोठं आणि काहीसं वाद निर्माण करणारं विधान केलं आहे. 'कोकणातून मी शिवसेना संपवली.. पाच जिल्ह्यात शिवसेना कुठेच नाही..' असं नारायण राणे म्हणाले. राणेंचा रोख हा जरी उद्धव ठाकरे यांच्यावर असला तरी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेच्या दृष्टीने देखील हे विधान महत्त्वाचं ठरणार आहे. (bjp mp narayan rane directly said i finished shiv sena from konkan what is exact meaning of statement shiv sena ubt shiv sena shinde group)

ADVERTISEMENT

'जे कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढेही जाऊ..', नारायण राणे नेमकं काय म्हणाले.. 

महाविकास आघाडीने विधानसभेत विजयाचा दावा केला आहे असा प्रश्न जेव्हा नारायण राणे यांना विचारण्यात आला तेव्हा राणे म्हणाले की, 'आम्ही सांगतो ना आम्हीच येणार ते.. आम्ही इथं आहोत आणि राहणार.. जसं केंद्रात नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा आले आणि पंतप्रधान झाले त्यामुळे कोणी दावा करून काय फरक पडत नाही. कोकणातून मी शिवसेना संपवली.. पाच जिल्ह्यात शिवसेना कुठेच नाही..' 

'जे कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढेही जाऊ.. त्यांचा पायच बाजूला केलाय मी.. ही भाषा बोलू नये.. सगळे आडवे झालेत. कोकणात तर आम्ही साफ केलंय. इथे कोणाला शिरू देणार नाही..' 

हे ही वाचा>> 'मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्याला...', मनसे नेता संतापला!

राणेंना राऊतांचं प्रत्युत्तर

दरम्यान, नारायण राणे यांच्या या टीकेला शिवसेना (UBT) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत राणेंवर जोरदार टीका केली आहे. 

'शिवसेनेला संपवणारी औलाद अद्यापही जन्माला यायचीय. पैशाच्या मस्तीवर जरी या मतदारसंघात फक्त 48 हजारांनी विजय मिळवला असेल तरी त्यांचे हात स्वर्गाला टेकले असं त्यांनी समजू नये.' 

'एवढं होतं तर नरेंद्र मोदींनी यांची औकात काय आहे ते ओळखलं.. म्हणून मंत्रिमंडळात स्थान पण दिलेलं नाही. त्यामुळे शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनाच राजकारणातून संपवण्याची ताकद शिवसेनेत आहे.' असं प्रत्युत्तर विनायक राऊतांनी यावेळी दिलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> ''देवेंद्र फडणवीसांचा दंगली घडवण्याचा कट होता''

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार? 

नारायण राणे हे विधान जरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी केलं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेला याचा नक्कीच विचार करावा लागणार आहे. कारण रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि पालघर या मतदारसंघांमध्ये शिवसेना (शिंदे गट) यांचा उमेदवारच लोकसभेत नव्हता. त्यामुळे आता नारायण राणेंच्या या विधानाचा नेमका रोख कोणाकडे होता याचीही सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT