CM केजरीवाल पुन्हा ‘मातोश्री’वर; ठाकरेंसमोर मोदींना म्हणाले अहंकारी, स्वार्थी माणूस…
Aap and Shiv sena UBT: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘मातोश्री’वर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ज्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.
ADVERTISEMENT

CM Arvind Kejriwal in Matoshree: मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी आज (24 मे) पुन्हा ‘मातोश्री’वर येऊन शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यानंतर तिघांनीही पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘अहंकारी, स्वार्थी माणूस देश चालवू शकत नाही.’ असं म्हणत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यावेळी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. (cm kejriwal returns to matoshree in front of uddhav thackeray he criticized the bjp and called modi an arrogant and selfish person)
पाहा ‘मातोश्री’वर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री केजरीवाल काय म्हणाले:
‘उद्धव ठाकरेंनी आम्हाला त्यांच्या कुटुंबाचा भाग बनवलं आहे. मी देखील सांगू इच्छितो की, आम्ही देखील नातं सांभाळणारी लोकं आहोत. आपल्यासोबत नातं बनवलं आहे तर आयुष्यभर हे नातं आम्ही सांभाळू. जसं आपल्याला माहिती आहे की, दिल्लीच्या लोकांनी आपल्या अधिकारासाठी मोठी लढाई लढली. आमचं सरकार 2015 साली दिल्लीत येताच मोदी सरकारने आमची सगळी शक्ती काढून घेतली. ती देखील एक छोटासा अध्यादेश जारी करून.’
‘आठ वर्ष दिल्लीच्या लोकांनी लढाई लढली सुप्रीम कोर्टात.. त्यानंतर आमच्या बाजूने कोर्टाने निर्णय दिला. ज्या दिवशी निर्णय आल्या त्याच्या आठ दिवसातच केंद्र सरकारने अध्यादेश जारी करून ती सगळी शक्ती पुन्हा काढून घेतली. लोकशाहीमध्ये लोकांचं ऐकलं गेलं पाहिजे की राज्यपालांचं?’
‘लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या सरकारकडे अधिकार असायला हवे. कारण जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ते सरकार बांधील असतं. पण तसं होत नाहीए. म्हणजेच याचा अर्थ असा की, आम्ही सुप्रीम कोर्टाला मानत नाहीत. या लोकांचं मागील काही दिवसातील वागणं देखील आम्ही पाहिलं. की, कसं यांच्या मंत्र्यांनी, नेत्यांनी सुप्रीम कोर्टाच्या दुसऱ्या न्यायाधीशांना अतिशय घाणेरड्या शिव्या देतात.’