खारघर दुर्घटनेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, कॉंग्रेस आमदाराची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Congress mla demands cm eknath shinde should resign
Congress mla demands cm eknath shinde should resign
social share
google news

Congress mla demands cm shinde should resign : नवी मुंबईच्या खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात 13 श्रीसेवकांचा उष्माघातामुळे मृ्त्यु झाला होता. या मृत्यूप्रकरणात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या घटनेत आता आमदार प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांनी मुख्यमंत्र्यांनी घटनेची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा,अशी मागणी केली आहे.तसेच या घटनेमुळे दोन दिवसाचे अधिवेशन बोललण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. आता या प्रकरणात नेमके काय होते, हे पाहावे लागणार आहे. (congress mla praniti shinde demands cm shinde should resign taking responsibility for Kharghar tragedy)

ADVERTISEMENT

खारघरमध्ये 16 एप्रिल रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांच्या 13 श्री सेवकांचा बळी गेला होता. हा आकडा ऑफ द रेकॉर्ड आहे, या अनुषंगाने कारवाई झाली पाहिजे, असे प्रणिती शिंदे (Praniti shinde) म्हणाल्या आहेत. तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीच दुपारी कार्यक्रम घेतल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत असल्याचे प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला नागरी सुविधा नव्हत्या, मात्र व्हीआयपीसना सुविधा उपलब्ध होत्या, ही गोष्ट देखील त्यांनी अधोरेखील केली.

हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार,मग पाटावर कोण बसणार? ठाकरे गटाची शिंदेंवर टीका

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळेच मृत्यू झाला का याची चौकशी झाली पाहिजे. तसेच मुख्यमंत्र्यांनी घटनेची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील प्रणिती शिंदे यांनी केली आहे. या घटनेमुळे दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. राज्य सरकारकडून श्री सेवकांची काळजी घेतली गेली नाही. भाजप शिंदे सरकारकडून पॉलिटिकल इव्हेंट करण्यासाठी श्री सेवकांचा वापर केला गेला आहे का..? उष्माघातामुळे असे मृत्यू कधी झाले नाही, याच्या मागचे कारण कळाले पाहिजे, बळजबरीने श्री सेवकांना घेऊन जाण्यात आले होते, त्या ठिकाणी धार्मिक राजकारण करण्यात आले का ? असे सवाल देखील प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केले. काँग्रेस पक्ष आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करतो. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बद्दल काँग्रेस पक्षाला प्रचंड आदर असल्याचे देखील प्रणिती शिंदे (Praniti shinde) म्हणाल्या आहेत.

हे वाचलं का?

खारघर दुर्घटनेतील 14 जणांच्या मृत्यूची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. सोमवारी 24 एप्रिलला विरोधकांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती.

हे ही वाचा : अजित पवार मुख्यमंत्री होणार? उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना दिला मोठा प्रस्ताव

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT