Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : दानवे फडणवीसांना म्हणाले, “कावळ्यांची काविळ”
फडणवीस हे कलंक आहेत, या विधानावरून भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. या टीकेनंतर अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray vs Devendra fadnavis : ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपुरला लागलेला कलंक आहे’, या उद्धव ठाकरे यांच्या विधानावरून भाजप विरुद्ध ठाकरे अशी ठिणगी पडलीये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलंकीची काविळ असा प्रतिहल्ला ठाकरेंवर केला. त्याला आता विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर देवेंद्र फडणवीसच नव्हे, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. फडणवीसांनी ट्विट केल्यानंतर त्याला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं असून, त्यांनी काही मुद्दे उपस्थित करत फडणवीसांवर हल्ला चढवला.
अंबादास दानवेंनी फडणवीसांना काय दिलंय उत्तर?
1) ज्यांच्या विरुद्ध लढून तुमच्या पक्षाचा पाया मजबूत केला अश्या गोपीनाथ मुंडे यांच्या लढ्याला तिलांजली देऊन त्यांचे राजकीय वैरी फोडाफोडीने जवळ करणे, याला म्हणतात कलंक!)
2) ‘मन की बात’ उर्दूतून प्रसिद्ध करणे, मशिद भ्रमण करणे आणि पुन्हा स्वतःला हिंदुत्वाचा पाईक म्हणणे, याला म्हणतात कलंक!