एकनाथ शिंदेंची अजित पवारांवर मात? राष्ट्रवादीचे मंत्री जिल्ह्याबाहेर!
स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होते. पण, अनेक मंत्र्यांकडे दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाची जबाबदारी असल्याने राष्ट्रवादीच्या मंत्री ध्वजारोहण करणार आहेत.
ADVERTISEMENT

flag hoisting on independence day : अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील एक गट सत्तेत सामील झाला. 9 जण मंत्री झाले, पण त्यांना अजूनही कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री केलं गेलं नाहीये. त्यामुळे हे मंत्री कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणार याची उत्सुकता होती. मंत्र्यांकडून स्वतःच्याच जिल्ह्यात ध्वजारोहणासाठी प्रयत्न केले जात असताना दोन मंत्री वगळता राष्ट्रवादीच्या इतर मंत्र्यांना जिल्ह्याबाहेर जाऊन ध्वजारोहण करावं लागणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी यावेळी अजित पवारांवर मात केल्याची चर्चा सुरू झालीये.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेते आपापल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. पण, स्वातंत्र्यदिनी या मंत्र्यांना जिल्हाबाहेर जावं लागणार आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवार गटाला जड ठरल्याचे म्हटले जात आहे.
धनंजय मुंडे स्वतःच्याच जिल्ह्यात करणार ध्वजारोहण
अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नऊ जण मंत्री आहेत. यात धनंजय मुंडे वगळता कुणालाही स्वतःच्या जिल्ह्यात ध्वजारोहण करता येणार नाही. धनंजय मुंडे हे स्वातंत्र्यदिनी बीडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी अजित पवार आग्रही असल्याचे म्हटले जात आहे. पण, ते कोल्हापूरमध्ये ध्वजारोहण करणार आहे.
वाचा >> “पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असता तर कानशिल लाल केले असते”, आव्हाडांच्या संतापाचा कडेलोट
नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळाचं चांगलं वर्चस्व आहे, पण ते अमरावतीमध्ये ध्वजारोहण करणार आहेत. दिलीप वळसे-पाटील वाशिम जिल्ह्यात, तर धर्मराव आत्राम गडचिरोलीत ध्वजारोहण करणार आहेत.