‘महिनाभर थांबा, तुम्ही पण भाजपत येणार’, विधानसभेत गिरीश महाजनांचा नवा बॉम्ब
एकनाथ शिंदे यांच्या बंडापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सातत्याने होत होत्या. राष्ट्रवादीबद्दल होणाऱ्या चर्चांवर 2 जुलै रोजी शिक्कामोर्तब झालं.
ADVERTISEMENT
Maharashtra Politics : महाराष्ट्रासह देशात फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू असल्याचे दिसत आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रात ऑपरेशन लोट्स करत भाजपने स्वतःची सरकारं आणल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाला. त्यातच आता गिरीश महाजन यांनी विधानसभेत बोलताना थोडं थांबा तुम्हीही भाजपत येणार’, असा नवा बॉम्ब टाकला.
ADVERTISEMENT
विधानसभेतील कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर दिलीप वळसे-पाटील यांच्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन अध्यादेश मांडण्यासाठी उभे राहिले. गिरीश महाजन बोलत असतानाच मध्येच काँग्रेसचे नेते आणि यशोमती ठाकूर यांनी त्यांना मध्येच चिमटा काढला. त्यावर गिरीश महाजन म्हणाले, “मग तुम्ही पण इकडे याल हळूहळू… थांबा बोलू नका. थोडा वेळ थांबा फक्त. महिनाभरच थांबा. (त्यानंतर गिरीश महाजनांनी हसतच अध्यदेश मांडला.)”
काँग्रेसमधील नेते भाजपत जाण्याच्या चर्चा
एकनाथ शिंदे यांच्या बंडापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सातत्याने होत होत्या. राष्ट्रवादीबद्दल होणाऱ्या चर्चांवर 2 जुलै रोजी शिक्कामोर्तब झालं. अजित पवारांनी भाजपशी बोलणी करून थेट उपमुख्यमंत्री झाले.
हे वाचलं का?
‘मविआ’ खिळखिळी करण्याचे प्रयत्न
राज्यात महाविकास आघाडीसाठी अनुकूल स्थिती असल्याचे सर्व्हे समोर आले होते. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचा आरोप विरोधकांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अलिकडेच झालेल्या भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात याबद्दल एक मोठं विधान केलं होतं.
वाचा >> Lok Sabha 2024 : भाजपचं ‘खेला होबे’! शिंदे, पवारांनंतर आणखी तीन नेते ‘एनडीए’त
“सध्या राजकीय परिस्थितीत बेरजेचे राजकारण गरजेचं आहे. महाविकास आघाडी तुटणं आपल्यासाठी आवश्यक होतं. त्यांची तीन पक्षांची एकत्रित बेरीज आपल्यासाठी अडचणीची ठरणार होती. त्यामुळे आपल्याला बेरजेचे राजकारण करावे लागले”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
ADVERTISEMENT
वाचा >> Maharashtra assembly session : राष्ट्रवादीचे आमदार विधानसभेत कुठे बसले?
“मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील. येत्या काळात त्यागाची तयारी ठेवा, हे यापूर्वीच सांगितलं होतं. येत्या लोकसभा आणि विधानसभेसाठी झोकून देऊन काम करा. येणारा काळ आपलाच असेल याची खात्री देतो”, असेही ते म्हणाले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT