Chhagan Bhujbal : आव्हाड भुजबळांना म्हणाले, "तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता तर..."
Jitendra Awhad Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी बारामतीतील सभेत शरद पवारांवर गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी खडेबोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर केले गंभीर आरोप

भुजबळांच्या आरोपांना जितेंद्र आव्हाड यांनी दिले प्रत्युत्तर

महायुती सरकारच्या भूमिकेवर तिखट शब्दात टीका
Chhagan Bhujbal Jitendra Awhad : "पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चालले आहेत", असे म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. भुजबळांनी केलेल्या आरोपांवर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारच्या भूमिकेवर टीकास्त्र डागलं. तसेच भुजबळांनाही खडेबोल सुनावले. (MLA Jitendra Awad responded to Cabinet Minister Chhagan Bhujbal's allegations against Sharad Pawar)
महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत बनला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी शिंदे सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. यावरून छगन भुजबळ यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. त्यावर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे.
छगन भुजबळांना जितेंद्र आव्हाडांनी काय दिले उत्तर?
जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, "भुजबळसाहेब तुम्ही आदरणीय पवारसाहेबांबाबत केलेले वक्तव्य आम्ही सर्वांनीच ऐकले. गेली दोन वर्षे राज्यातील शिंदे फडणवीस सरकार आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वच बाजूंना केवळ खेळवत आहे."
हेही वाचा >> 'शरद पवारांचे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेत', भुजबळांच्या विधानाने खळबळ
"आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठका घ्यायच्या मात्र अंतिम तोडगा काहीच काढायचा नाही, चर्चांमधे सर्वांना गुंतवून ठेवून या प्रश्नांचे घोंगडे भिजत ठेवायचे, हिच या सरकारची रणनीती आहे. परवाची आरक्षण विषयक सर्वपक्षीय बैठक हा देखील सरकारचा त्यापैकीच एक प्रकार होता", असा गंभीर आरोप करत आव्हाडांनी महायुती सरकारच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली.