Ladka bhau yojana: 12 वी पास तरुणांना 6 हजार रुपये, तर पदवीधरांना... शिंदे सरकार देणार प्रचंड पैसे!
Maza Ladka bhau yojana: माझी लाडकी बहीण या योजनेसारखीच आणखी एक योजना शिंदे सरकारने जाहीर केली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सरकार हजारो रुपये स्टायपंड म्हणून देणार आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
माझी लाडकी बहीण योजनेनंतर आणखी एक योजना
लाडका भाऊ योजनाही शिंदे सरकारने आणणार अंमलात
तरुणांना शिंदे सरकार देणार हजारो रुपये!
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता आता राज्यातील शिंदे सरकारने लाडका भाऊ ही योजना अंमलात आणणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी काल (16 जुलै) पंढरपुरात बोलताना याविषयी भाष्य केलं. आहे. तसंच त्याचा शासन आदेश देखील जारी झाला आहे. 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' (CM Youth Work Training Scheme) असं या योजनेचं नाव असून त्याअंतर्गत तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पैसे देण्यात येणार आहेत. (ladka bhau yojana 6 thousand rupees for 12th pass youth while for graduates 10 thousand rupees shinde government will give huge money)
ADVERTISEMENT
माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना सरसकट दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. अशावेळी आता तरुणांना आणि बेरोजगारी हे दोन मुद्दे समोर ठेवून शिंदे सरकारने ही योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत 12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 6000 रुपये, आय.टी.आय/ पदविका केलेल्या विद्यार्थ्यांना 8000 रुपये आणि पदवीधर तरुणांना 10,000रुपये स्टायपंड देण्यात येणार आहे.
हे ही वाचा>> Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF फॉर्म करा डाऊनलोड!
लाडक्या भावांसाठी नेमकी योजनेबाबत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल पंढरपूरमध्ये बोलताना लाडका भाऊ योजनेबाबत असं म्हणाले की, 'आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आपल्यावर टीका केली. ते म्हणाले, लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, आता लाडक्या भावांचं काय? मला त्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे.'
हे वाचलं का?
'जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला आहे त्याला दरमहा 6000 रुपये, आय.टी.आय/ पदविका केलेल्या तरुणाला 8000 हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10,000 रुपये महिन्याला दिले जातील.'
सरकार कंपन्यांकडे देणार पैसा..
मात्र, या तरुणांना सरसकट पैसे मिळणार नाही. त्याबाबत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती देताना सांगितलं की, 'एखादा तरूण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप (Apprenticeship) करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे.'
ADVERTISEMENT
'या योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपलं सरकार पैसे भरणार आहे.' असं विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Mazi Ladki Bahin Yojana Installment : रक्षाबंधनाची ओवाळणी! पहिला हफ्ता कधी जमा होणार?
म्हणजेच या योजनेअंतर्गत जे तरुण कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील त्यांना सरकार स्टायपंड देणार आहे.
जीआरमध्ये नेमकं काय?
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – CM Youth Work Training Scheme” सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे स्वरूप
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमांर्तगत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (CM Youth Work Training Scheme) योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील.
१) या उपक्रमाअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज उदा. उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, विद्यावेतन अदा करणे, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील. यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची राहील.
२) बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील.
३) लघु आणि मध्यम (SMEs) व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना/महामंडळ, सामाजिक संस्था (कंपनी कायदा, २०१३ मधील सेक्शन ८) आणि विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील. किमान २० रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या आस्थापना/उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणच्या (CM Youth Work Training Scheme) संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील. या योजनेंतर्गत पात्र आस्थापना / उद्योग यांची यादी खालील शासन निर्णयातील प्ररीशिष्ट-अ मध्ये नमूद आहे.
४) शासकीय / निमशासकीय आस्थापना / उद्योग / महामंडळाची सबंधित तालुका /जिल्हा/विभाग/ राज्यस्तरीय कार्यालये या योजनेंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील.
५) रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ करेल.
उमेदवाराची पात्रता:
१) उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.
२) उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय / पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.
३) उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
४) उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
५) उमेदवाराचे बैंक खाते आधार संलग्न असावे.
६) उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
आस्थापना /उद्योगासाठीची पात्रता:
१) आस्थापना / उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
२) आस्थापना / उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
३) आस्थापना / उद्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी.
४) आस्थापना/उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate Of Incorporation, DPIT व उद्योग आधार ची नोंदणी केलेली असावी.
शैक्षणिक अर्हता |
प्रतिमाह विद्यावेतन रु. |
12 वी पास |
रु. ६,०००/- |
आय.टी.आय/ पदविका |
रु. ८,०००/- |
पदवीधर /पदव्युत्तर |
रु. १०,०००/- |
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT