Loksabha सर्व्हे: महाराष्ट्राने शिंदे-अजित पवारांना नाकारलं, NDA ला मिळणार फक्त…

रोहित गोळे

ADVERTISEMENT

lok sabha 2024 in maharashtra nda will be a huge decrease in the seats elections survey india got 24 seats maharashtra politics
lok sabha 2024 in maharashtra nda will be a huge decrease in the seats elections survey india got 24 seats maharashtra politics
social share
google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra: मुंबई: लोकसभा 2024 निवडणुकांना (Lok Sabha 2024) आता साधारण दहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक राहिला आहे. अशावेळी आताच्या घडीला देशात निवडणुका (Election) झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका हा भाजप (BJP) आणि एनडीएला (NDA) महाराष्ट्रात (Maharashtra) बसू शकतो. इंडिया टीव्ही या वृत्तवाहिनीने केलेल्या एका सर्व्हेमध्ये भाजपसह त्यांच्या मित्रपक्षांना धक्का देणारा कौल मतदारांनी सर्व्हेतून दिला आहे. (lok sabha 2024 in maharashtra nda will be a huge decrease in the seats elections survey india got 24 seats maharashtra politics news live today)

2014 आणि 2019 साली महाराष्ट्रातील जनतेने एनडीएच्या पारड्यात भरभरून मतदान केलं होतं. पण 2019 नंतर राज्यातील राजकारण हे पार बदलून गेलं. एनडीए आणि नुकत्याच तयार झालेल्या ‘इंडिया’मुळे (INDIA) सगळी समीकऱणं बदलली आहेत. अशावेळी जो सर्व्हे आता करण्यात आला आहे त्यामध्ये मतदारांनी एनडीएला मोठा दणका दिला आहे. सर्व्हेत भाजपपेक्षा त्यांच्या मित्र पक्षांना मतदारांनी नाकारल्याचं सर्व्हेत पाहायला मिळत आहे.

सर्व्हेनुसार भाजपला लोकसभेच्या 20 जागा मिळू शकतात. तर त्या पाठोपाठ शिवसेना (UBT) पक्षाला तब्बल 11 जागा मिळू शकतात. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा दिलासा असू शकतो. तर याशिवाय काँग्रेसच्या जागांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. कारण 2019 साली अवघी 1 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 9 जागा मिळू शकतात. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या गटाला 4 जागा मिळू शकतात. याचा अर्थ विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला महाराष्ट्रात तब्बल 24 जागा मिळतील असा सर्व्हेत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sambhaji Bhide: ‘गांधींविरुद्ध बोलण्याची औकात आहे का भिडेची?’, माजी मंत्री प्रचंड संतापले

दरम्यान, या निवडणुकीत सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बसताना दिसत आहे. या दोघांच्या गटाला अवघा 2-2 जागा मिळू शकतात. त्यामुळे या दोन्ही पक्षांसह एकप्रकारे भाजपला देखील महाराष्ट्रात फटका बसताना दिसत आहे.

2022 पासून महाराष्ट्रात आमदारांनी पक्षात जी बंडाळी केली आहे तो प्रकार महाराष्ट्रातील जनतेला अजिबात पसंत पडलेला नाही.

ADVERTISEMENT

कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?

 1. भाजपा – 20 जागा
 2. काँग्रेस – 9 जागा
 3. शिवसेना (UBT)- 11 जागा
 4. शिवसेना (शिंदे गट) 2 जागा
 5. NCP (शरद पवार) – 4 जागा
 6. NCP (अजित पवार) – 2 जागा

महाराष्ट्रात कोणत्या विभागात कोणाला किती जागा मिळतील?

सर्व्हेनुसार आगामी लोकसभेत उत्तर महाराष्ट NDA ला  3 जागा आणि INDIA 3 जागा मिळतील तर विदर्भ देखील दोन्ही आघाड्यांना पाच-पाच जागा मिळतील. तर मराठवाड्यात NDA 2 आणि INDIA ला तब्बल 6 जागा मिळू शकतात. तर मुंबईत NDA ला 4 आणि INDIA ला दोन जागा मिळतील असा अंदाज आहे. तर ठाणे आणि कोकण विभागात NDA ला 5 आणि INDIA ला 2 मिळण्याची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात NDA ला 5 INDIA ला 6 जागा मिळण्याचा अंदाज सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

कोणाला किती टक्के मतदान?

 • आगामी लोकसभेत भाजपला महाराष्ट्रात 32 टक्के मतदान होण्याची शक्यता
 • शिवसेना शिंदे गटाला 7 टक्के मतदान
 • तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 5 टक्के मतदान
 • तर काँग्रेसला 16 टक्के मतदान मिळण्याचा अंदाज
 • तर शिवसेना (UBT) गटाला 16 टक्के मतदान
 • तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 13 टक्के मतं मिळू शकतात.
 • तर इतरांच्या पारड्यात 11 टक्के मतदान होऊ शकतं
 • म्हणजे  महाराष्ट्रात 44 टक्के एनडीएला आणि इंडियाला 45 टक्के मतदान होऊ शकतं

लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये  एनडीएला बसणार मोठा फटका?

एनडीएला 2019 साली तब्बल 41 जागा महाराष्ट्रात मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपने 25 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 23 जागांवर त्यांना विजय मिळाला. तर शिवसेनेने 23 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागांवर आणि काँग्रेस, एमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी 1-1 जागांवर निवडून आले होते.

हे ही वाचा >> Raj-Uddhav: ठाकरे बंधू महाराष्ट्रात इतिहास घडवतील?, ‘ही’ चर्चा अन्…

मात्र, आता सर्व्हेनुसार महाराष्ट्रातील जी राजकीय परिस्थिती झाली आहे ते पाहता राज्यातील जनता इंडिया आणि एनडीएला समसमान म्हणजे 24-24 जागा देत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

दरम्यान, हा एक सर्व्हे आहे. निवडणुकीपर्यंत अनेक समीकरणं बदलू शकतात. त्यामुळे त्यावेळेस मतदार नेमका काय विचार करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

  follow whatsapp

  ADVERTISEMENT