मुंबई Tak बैठक: वाझे, परमबीर प्रकरणात अनिल देशमुखांकडून पुन्हा मोठा गौप्यस्फोट
मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
ADVERTISEMENT
Anil Deshmukh: मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच निलंबित पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि बडतर्फ एपीआय सचिन वाझे यांच्याबाबत पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात बोलताना अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. (mumbai tak meeting ncp leader anil deshmukh again makes sensational allegations in sachin waze former cp parambir case)
ADVERTISEMENT
सचिन वाझेला बडतर्फ केल्याने आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना निलंबित केल्यानंतरच त्यांनी माझ्यावर 100 कोटींचे आरोप केले. जर आरोप करायचे होते तर त्यांनी नोकरीत असतानाच आरोप करायला हवे होते. पण त्यांनी नोकरी गमावल्यानंतर आरोप केले. असं अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
अनिल देशमुख यांनी वाझे-परमबीर यांच्यावर केलेले आरोप जसेच्या तसे:
‘मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला होता. चार-पाच दिवसानंतर आम्हाला समजलं की, हा बॉम्ब सचिन वाझेने ठेवला होता. त्याचे अतिशय जवळचे असलेले मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांच्या माध्यमातून ठेवण्यात आला होता. म्हणजे मुंबईचे पोलीस आयुक्तांचा बॉम्ब ठेवण्यात हात असू शकतो याचं सर्व जगाला आश्चर्य वाटू शकतं.’
हे वाचलं का?
‘एनआयएकडे प्रकरण जाण्याआधीच आम्हाला कळलं होतं की, सचिन वाझे यांनीच बॉम्ब ठेवला होता. सचिन वाजे त्यात गुंतलेला होता नंबर एक.. नंबर दोन.. आयुक्तालयाचे चार अधिकारी या प्रकरणात गुंतलेले होते. यात पांढरी इनोव्हा यात होती. संपूर्ण मशनिरी पोलीस आयुक्तालयाची असताना पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना ही गोष्ट माहित नव्हती?’
अधिक वाचा- ‘अबू जिंदाल, अजमल कसाब’; संजय राऊत, अनिल देशमुखांनी सांगितले तुरुंगातील झोप उडवणारे अनुभव
‘कारण परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचे किती जवळचे संबंध होते.. परमबीर सिंह आयुक्त होते.. सचिन वाझे फौजदार जरी असला तरी गेल्या पंचवीस वर्षापासून त्यांचे जवळचे संबंध होते. असं असताना सीनियर अधिकाऱ्यांना सांगितलं की, साहेब यात संपूर्ण सीपी ऑफिसच्या बाहेरचं कोणीही नाही.’
ADVERTISEMENT
‘मुकेश अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवलं त्यात सीपी ऑफिसशिवाय कोणीही बाहेरचं नाही. नंतर हे प्रकरण गंभीर असल्याचं आम्हाला समजलं. हे लक्षात आल्यानंतर मी गृहमंत्री म्हणून परमबीर सिंह यांची अतिशय कमी महत्त्वाच्या पदावर बदली केली. बदली करून आम्ही त्यांना निलंबितही केलं. त्यानंतर सचिन वाझेला सरकारी नोकरीतून काढून टाकलं. त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांनी एकत्र येऊन माझ्यावर आरोप केले. जेव्हा ते लोकं खुर्चीत बसले होते तेव्हा त्यांनी आमच्यावर आरोप नाही केले. जेव्हा परमबीर सिंहला नोकरीत निलंबित केलं तेव्हा त्यांनी माझ्यावर 100 कोटीचे आरोप केले.जेव्हा नोकरीत होते तेव्हा त्यांनी आरोप करायला पाहिजे होते ना.’
ADVERTISEMENT
अधिक वाचा- ‘माझं मेस्सीसारखं झालंय’, एकनाथ शिंदेंवर घणाघात, आदित्य ठाकरे काय म्हणाले?
‘सचिन वाझे फौजदार होता.. त्याला पु्न्हा नोकरीत घेण्याचा अधिकार हा आयुक्तांचा होता. प्रत्येक स्तरावरचे वेगवेगळे अधिकार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे असतात. त्यामुळे कोणता अधिकारी कोणत्या फौजदाराला परत नोकरीत घेतो याची सर्वच माहिती काही गृहमंत्र्याकडे नसते. कारण राज्यात हजारो फौजदार आहेत. सचिन वाझेला परत घेतल्यानंतर त्यासंबंधी माझ्याकडे जेव्हा तक्रार आली तेव्हा मी परमबीर सिंह यांना बोलावलं होतं. त्यांना सांगितलं होतं की, हा सचिन वाझे कोण आहे ते मी पहिल्यांदा ऐकतो आहे त्याला नोकरीत घेतल्याबद्दल तक्रार देखील आहे.’
अधिक वाचा- मुंबई Tak बैठक: ‘तू आणि उद्धव ठाकरे मी असेपर्यंत..’ राणेंनी सांगितला बाळासाहेबांचा ‘तो’ किस्सा
‘तेव्हा परमबीरने मला सांगितलं की, साहेब त्याच्याबद्दल तक्रार असतील पण मी त्याला 25-30 वर्षापासून ओळखतो. त्याच्याबद्दल ज्या तक्रारी आहेत त्या खोट्या आहेत. माझा तो अतिशय जवळचा असल्याने त्याची मदत होईल असं त्यांनी मला त्यावेळी सांगितलं होतं.’
‘मी एक उदाहरण देतो.. एखादा खून होतो तेव्हा त्याबाबत नेमकी माहिती समोर यायला थोडा तरी वेळ येतो. आता मनसुख हिरेनचा ज्या दिवशी खून झाला होता त्याच दिवशी सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अशावेळी लगेच माहिती उपलब्ध नव्हती.’ अशी खळबळजनक माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT