Maharashtra Budget 2025: मुंबईकरांचा 'हा' प्रवास फक्त 10 मिनिटात, प्रचंड मोठी घोषणा
वांद्रे ते वर्सोवा हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करता येणार आहे. कारण यासाठी सरकारने एक मोठा प्रकल्प हाती घेतला असून त्याबाबत अर्थसंकल्पात घोषणा देखील करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वांद्रे ते वर्सोवा हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात
मुंबईत अनेक मोठ्या प्रकल्पांची कामं सुरू
अर्थसंकल्पात सरकारने काय केली घोषणा?
मुंबई: राज्य अर्थसंकल्पात सरकारने राज्याच्या रस्ते विकासासाठी भरीव आर्थिक तरतूद जाहीर केली असून, यामुळे शहरे आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुकर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना रस्ते विकासासाठी हजारो कोटींची गुंतवणूक जाहीर केली आहे. याचवेळी त्यांनी मुंबईकरांसाठी गुड न्यूजही दिली आहे.
मुंबईकरांना प्रवास सुखकर व्हावा यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात नव्या रस्ते बांधणीची कामं सरकारने हाती घेतली आहे. त्याचविषयी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली असून त्याबाबत करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
हे ही वाचा>> Maharashtra Budget: लाडक्या बहिणींना 2100 मिळणार की 1500 रुपयेच, अजितदादांनी नेमकी काय केली घोषणा
वांद्रे ते वर्सोवा अवघ्या 10 मिनिटांचा प्रवास
मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि पश्चिम उपनगरातील दळणवळण सुलभ करण्यासाठी वांद्रे ते वर्सोवा दरम्यान 14 किमी लांबीचा सागरी सेतू बांधण्याचे काम सुरू आहे.
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू पूर्ण झाल्यानंतर, वांद्रे ते वर्सोवा हे अंतर अवघ्या 10 मिनिटांत पार करता येईल. भविष्यात, हा सेतू वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडशी जोडला जाणार आहे, ज्यामुळे मरीन ड्राइव्ह ते दहिसर हा दीड तासांचा प्रवास फक्त 45 मिनिटांत पूर्ण करता येईल.










