पंकजा मुंडेंसाठी सुप्रिया सुळे सरसावल्या; अमित शाहांवर ‘बाण’, काय म्हणाल्या?
भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई झाली आहे. या कारवाईनंतर सुप्रिया सुळे यांनी थेट अमित शाहांवर टीका केली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची 19 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

Pankaja Munde Supriya Sule Tweet : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ज्या कारखान्याच्या चेअरमन आहे, त्याच कारखान्याची तब्बल 19 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलीये. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या नेत्याच्या कारखान्यावर झालेली ही कारवाईने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. पण, भुवया उंचावल्या गेल्या, त्या सुप्रिया सुळेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे. पंकजा मुंडेंवर होत असलेल्या अन्यायाची बाब थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडेच मांडलीये.
पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केलीये. जीएसटी विभागाने तब्बल 19 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केलीये. या संपत्तीचा लिलाव करून रक्कम वसूल केली जाणार असल्याची माहिती आहे. पण, सत्ताधारी पक्षातील नेत्याच्याच कारखान्यावरील कारवाईने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
सुप्रिया सुळेंची थेट अमित शाहांकडेच मांडला मुद्दा
पंकजा मुंडेंच्या कारखान्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाहांकडेच मांडला. सुप्रिया सुळे यांनी एक्स वर एक ट्विट केलंय. हे ट्विट पंकजा मुंडे आणि केंद्रीय गृह तथा सहकारी मंत्री अमित शाह यांना टॅग केलं आहे.
हेही वाचा >> ‘या’ निकषावर ठरणार राष्ट्रवादी कुणाची? प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान
सुप्रिया सुळे म्हणतात, “जुन्या हिंदी सिनेमातील ‘अपनों पे सितम,गैरों पे करम’ या गाण्याची आठवण यावी, अशी स्थिती भाजपातील मूळ कार्यकर्त्यांची आहे. भाजपाच्या निष्ठावंतांवर किती अन्याय होतो याचे उदाहरणच द्यायचे झाले तर पंकजाताई मुंडे यांना मिळणाऱ्या सापत्न वागणूकीचे दिले पाहिजे.”