NCP : शरद पवारांचा एक खासदार झाला कमी, ECI सुनावणी आधीच कोर्टात झटका!

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

the Lok Sabha Secretariat has issued a notification of cancellation of membership of Nationalist Congress Party (NCP) leader Mohammad Faizal PP.
the Lok Sabha Secretariat has issued a notification of cancellation of membership of Nationalist Congress Party (NCP) leader Mohammad Faizal PP.
social share
google news

Mohammed Faizal disqualified as lok sabha member : राष्ट्रवादी काँग्रेसची केंद्रीय निवडणूक आयोगातील लढाई सुरू झाली आहे. पण, निवडणूक आयोगातील सुनावणीआधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द झाली आहे. फैजल हे लक्षद्वीपचे खासदार होते. वर्षभरात दोनदा खासदार अपात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. बुधवारी (४ ऑक्टोबर) लोकसभा सचिवालयाने सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना जारी केली.

ADVERTISEMENT

यापूर्वी फैजल यांची शिक्षा रद्द करणाऱ्या केरळ उच्च न्यायालयाने यावेळी तसे करण्यास नकार दिला आहे. फैजलला खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी केरळ हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळली आहे.

लोकसभा सचिवालयाने बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, ‘केरळ उच्च न्यायालयाच्या ३ ऑक्टोबर २०२३ च्या आदेशानुसार, केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी.पी. हे त्यांना दोषी ठरवण्यात आल्याच्या 11 जानेवारी 2023 तारखेपासून लोकसभा सदस्यत्वासाठी अपात्र ठरले आहेत. फैजल यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र घोषित करण्याची ही दुसरी वेळ आहे.

हे वाचलं का?

Mohammed faizal disqualified : यापूर्वी २५ जानेवारीला करण्यात आले होते निलंबित

यापूर्वी फैजल यांना 25 जानेवारी 2023 रोजी लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात आले होते. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कावरत्ती येथील सत्र न्यायालयाने फैजल आणि इतर तिघांना पी सलीहचा हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले होते आणि चौघांना 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.

यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. मात्र, नंतर केरळ उच्च न्यायालयाने फैजल यांची शिक्षा आणि शिक्षेला स्थगिती दिली. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने २९ मार्च रोजी फैजल यांचे सदस्यत्व बहाल केले होते.

ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय केला रद्द

त्यानंतर ऑगस्टमध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला होता. 22 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय ‘चुकीचा’ ठरवून फैजलच्या शिक्षेला स्थगिती देणारा निर्णय रद्द केला होता. सुप्रीम कोर्टाने खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी शिक्षा कायम ठेवली होती.

ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयाने फैझल यांचा लोकसभा सदस्य म्हणून तीन आठवड्यांचा दर्जा तात्पुरता राखून ठेवला होता. अशा स्थितीत फैजल हे लोकसभेतून अपात्र होण्याची चर्चा सुरू झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण केरळ उच्च न्यायालयाकडे परत पाठवले होते आणि फैजलच्या शिक्षेला या कालावधीत स्थगिती देण्याच्या मागणीवर नवीन निर्णय घेण्यास सांगितले होते.

‘लक्षद्वीपमध्ये पोटनिवडणूक होणार नाही’

अलीकडेच फैजल यांना केरळ उच्च न्यायालयाकडूनही झटका मिळाला आणि त्याची याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे 3 ऑक्टोबर रोजी लोकसभा सचिवालयाने अपात्रतेची अधिसूचना जारी केली. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदींनुसार, लक्षद्वीप लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार नाही. कारण सध्याच्या लोकसभेच्या कार्यकाळात एक वर्षाहून कमी कालावधी शिल्लक आहे. आता लोकसभेच्या पाच जागा रिक्त आहेत.

मोहम्मद फैजल प्रकरणात 4 महत्त्वाच्या तारखा…

– लक्षद्वीपच्या सत्र न्यायालयाने 11 जानेवारीला शिक्षा सुनावली.
– लोकसभेने त्यांना 13 जानेवारी रोजी संसदेतून अपात्र घोषित केले.
– केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभेने 29 मार्च रोजी संसदेचे सदस्यत्व बहाल केले.
– SC च्या आदेशानुसार, केरळ हायकोर्टाने शिक्षेवर पुनर्विचार केला आणि याचिका फेटाळली. दुसऱ्या दिवशी म्हणजे ४ ऑक्टोबरला लोकसभेने पुन्हा एकदा संसदेचे सदस्यत्व रद्द केले.

काय प्रकरण आहे

माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई मोहम्मद फैजल यांच्यावर काँग्रेस नेते मोहम्मद सलिया यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. मोहम्मद सलिया यांच्यावर जमावाने हल्ला करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून त्यात ते गंभीर जखमी झाले होते. मोहम्मद फैजलांवर जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप होता. मोहम्मद सलिया यांच्यावर अनेक महिन्यांपासून उपचार सुरू होते. या प्रकरणात 32 जणांना आरोपी करण्यात आले होते, त्यापैकी चार जणांना दोषी घोषित करण्यात आले होते. त्यात मोहम्मद फैजलचाही समावेश होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT