Rajasthan Elections 2023 : गेहलोतांच्या भूमीत मोदींची ‘जादू’, भाजपने कसा बदलला ‘गेम’?
rajasthan election results 2023, five reasons of bjp won in rajasthan : काँग्रेसला राजस्थानच्या जनतेने सत्तेवरून खाली खेचले. काँग्रेसच्या पराभवाची आणि भाजपच्या विजयाची कारणमीमांसा केली जात आहे. जाणून घेऊयात कुठल्या मुद्द्यांमुळे काँग्रेसचा झाला पराभव?
ADVERTISEMENT

राजस्थानमध्ये पुन्हा एकदा राजकीय परंपरा पाळली गेली. इथे 1993 पासून एक राजकीय पायंडा सुरू आहे. इथे दर पाच वर्षांनी सरकार बदलते, ही प्रथा यावेळीही कायम राहिली. कल बदलेल आणि गेहलोत यांची जादू चालेल, अशी काँग्रेसला आशा होती. पण ना गेहलोतांची जादू चालली ना रीत बदलली. काँग्रेसची काँग्रेसची राजवट मात्र बदलली गेली. मतमोजणीपूर्वी विजयाचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या खात्यात केवळ 69 जागा आल्या आहेत, तर 115 जागा जिंकत राजस्थानाच्या वाळवंटात कमळ फुलले.
राजस्थानमध्ये भाजप विजयाचा आनंद साजरा करत असताना काँग्रेस पराभवाची कारणे शोधत आहे. निवडणूक जिंकल्यानंतर वसुंधरा राजे यांनी विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांना दिले. दुसरीकडे अशोक गेहलोत म्हणाले की, राजस्थानच्या जनतेने दिलेला जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. हा निकाल प्रत्येकासाठी अनपेक्षित आहे. आमच्या योजना, कायदे आणि नवकल्पना लोकांपर्यंत नेण्यात आम्ही पूर्णपणे यशस्वी झालो नाही, हे या पराभवावरून दिसून येते.”
हेही वाचा >> तीन राज्यातील पराभवानंतर ठाकरेंनी काँग्रेसची केली कानउघाडणी
राजस्थानमधील विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आता राजस्थानची कमान कोणाच्या हाती द्यायची यावर विचारमंथन सुरू झाले आहे. पण 5 मोठी कारणे आहेत, ज्यामुळे राजस्थानमध्ये भाजपने विजयाचा गुलाल उधळला.
1) PM मोदींची जादू कायम
राजस्थानमधील भाजपच्या विजयाचं पहिलं कारण म्हणजे पंतप्रधान मोदींनी निवडणुकीच्या वर्षात राजस्थानचे अनेक दौरे केले. राजस्थानच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या सभा झाल्या. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी प्रचंड रोड शो केले. यावेळी त्यांनी गेहलोत सरकारवर वारंवार निशाणा साधला. राजस्थानमधील महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांकडे मतदारांचे लक्ष वेधले. यासोबतच राजेंद्र गुडा यांच्या लाल डायरीचा मुद्दाही जोर देऊन मांडण्यात आला. पीएम मोदींच्या मेहनतीचे रूपांतर यशात झाले.