Ravindra waikar : ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वायकरांच्या नातेवाईकाकडून वापर

मुंबई तक

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अमोल कीर्तिकर.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकाल वादात सापडला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा

point

अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीबद्दल तक्रार केली आहे

Ravindra Waikar Amol Kirtikar : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी वादात सापडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीबद्दल आक्षेप घेत निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाला आता नवे मिळाले असून, मुंबई पोलिसांनी नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वायकर यांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वापर केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी एफआरआय नोंदवला. (Mumbai Police FIR Against Ravindra waikar relative Mangesh pandilkar)

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर विजयी झाले. अमोल कीर्तिकर यांचा वायकर यांनी ४८ मतांनी पराभव केला. मतमोजणीवर आक्षेप अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेतलेला आहे. दरम्यान, मिड डे  इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

पोलिसांनी वायकरांच्या नातेवाईकाविरुद्ध दाखल केला गुन्हा

या प्रकरणात आता वनराई पोलिसांनी वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपासात पंडीलकर ईव्हीएमशी जोडलेला मोबाईल वापरत असल्याचे आढळून आले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> नारायण राणे थेट म्हणाले, "मी कोकणातून शिवसेना संपवली.." 

पोलिसांनी इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून, लवकरच यासंदर्भात अटक वॉरंट काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मतमोजणीवर संशय... पोलिसांनी काय सांगितले?

वनराई पोलिसांनी यासंदर्भात सांगितले आहे की, पंडीलकरकडे जो मोबाईल सापडला आहे. तो दिनेश गुरव यानेच त्याला दिला होता. हा मोबाईल ४ जून रोजी नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी वापरला गेला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> विजय वडेट्टीवारांसाठी गुड न्यूज, पुन्हा होणार आमदार? 

पोलिसांनी पुढे सांगितले की, आरोपी मंगेश पंडीलकर आणि दिनेश गुरव यांना सीआरपीसी 41 (अ) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजभर यांनी सांगितले की, पंडीलकरचा मोबाईल ४ जून रोजी जप्त केला होता. तसेच त्यातील माहिती जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे. 

ADVERTISEMENT

पंडीलकर हा नेमका कोणाच्या संपर्कात होता, हे अहवालानंतर स्पष्ट होईल. एन्ट्री पॉईंट्स, स्ट्राँग रुम आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज निवडणूक आयोगाकडे मागितले आहे. ते मिळाल्यानंतर तपासाला गती मिळेल. पंडीलकर आणि गुरव यांना चौकशीसाठी बोलवू. गजर पडल्यास अटक वॉरंट जारी करू, असेही पोलिसांनी सांगितले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT