Narayan Rane : कोकणात राणे-सामंतांमध्ये बॅनर'वार'; महायुतीत संघर्षाच्या ठिणग्या
Narayan Rane Uday Samant : राणे आणि सामंत यांच्यातील राजकीय संघर्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वाढला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राणे-सामंत संघर्षाला सुरूवात

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राणेंना मताधिक्य नाही

राणे-सामंत यांच्यात रंगलंय बॅनरवार
Maharashtra Politics Rane Samant : (गोकुळ कांबळे, रत्नागिरी) लोकसभा निवडणुकीआधी राणे आणि सामंत यांच्या समेट घडवून आणला गेला. पण, निकाल लागताच राणे विरुद्ध सामंत या राजकीय संघर्षाने डोकं वर काढलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निकालानंतर भाजपचे राणे आणि शिवसेनेचे सामंत यांच्या बॅनर'वार' सुरू झाला आहे. (The political dispute between Narayan Rane and Uday Samant has started again)
कोकणात पुन्हा एकदा राणे-सामंत संघर्ष उफाळून आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे विजयी झाले. पण, ज्या विधानसभा मतदारसंघाचे उदय सामंत आमदार आहेत, तिथे राणे यांना मताधिक्यच मिळाले नाही. रत्नागिरी, चिपळून आणि राजापूर विधानसभा मतदारसंघातून विनायक राऊत यांना मताधिक्य मिळाले.
हेही वाचा >> ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वायकरांच्या नातेवाईकाकडून वापर
हेच कारण ठरलं आहे राणे-सामंत संघर्षाला. माजी खासदार नीलेश राणे यांनी तर थेट सामंत बंधूवर आरोप करत निवडणुकीत काम न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसत आहे.
राणे विरुद्ध सामंत बॅनर'वार' कसं सुरू झालं?
नारायण राणे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर शिवसेनेकडून अभिनंदनाचा बॅनर शिवाजी चौकात लावण्यात आला होता. या बॅनरवरील किरण सामंत आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचा फोटो अज्ञाताकडून फाडण्यात आला.