Maharashtra Vidhan Sabha : अजित पवारांच्या आमदाराचा राजकीय संन्यास, वारसदारही ठरला!
Prakash Solanke : अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
माजलगावमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार बदलणार?
प्रकाश सोळंके यांची राजकीय निवृत्ती
जयसिंह सोळंके असणार प्रकाश सोळंके वारसदार
Prakash Solanke NCP : अजित पवार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना बीडमध्ये पक्षाच्या नेत्याने राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा आमदार प्रकाश सोळंके यांनी केली असून, त्यांनी त्यांचा राजकीय वारसदारही जाहीर केला आहे. (Prakash Solanke Announces political retirement)
लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी राहिल्यानंतर अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीची जोरात तयारी सुरू केली आहे. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. अशातच प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली आहे.
प्रकाश सोळंके लढवणार नाही निवडणूक
माजलगावचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी अचानक राजकीय निवृत्तीची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सोळंके यांनी जाहीर केले.
हेही वाचा >> पुणे पावसाच्या 'रडार'वर! मुंबईत कसे असेल हवामान?
एकीकडे प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली, तर दुसरीकडे त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल, याचीही घोषणा केली. प्रकाश सोळंके यांनी त्यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली आहे.










