PUNE By-Election: पुणे-चंद्रपूरची पोटनिवडणूक होणार नाही.. भाजपला नेमकी कसली भीती?
pune chandrapur byelections: पुणे, चंद्रपूर पोटनिवडणुका होणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारचं यावर एकमत देखील झालं आहे. पण यामागचं नेमकं राजकारण काय? अशी चर्चा आता रंगली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: पुणे (Pune) आणि चंद्रपूर (Chandrapur) दोन्ही लोकसभा मतदारसंघातल्या खासदारांचे निधन झाल्याने या दोन्ही जागा रिक्त झाल्या. त्यामुळे इथं पोटनिवडणुका (By-elections) लागणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, या दोन्ही लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुका लागणार नाही. त्या का लागणार नाहीत याचं कारणही आता समोर आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुका का घेणार नाहीत? निवडणूक आयोगानं नेमकं काय कारण दिलं? याबाबत केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे सविस्तरपणे जाणून घेऊयात. (pune chandrapur byelections will not be held what did the election commission discuss with central government what is real fear of bjp)
गिरीश बापट यांचं 29 मार्च 2023 रोजी निधन झालं. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यानंतर दोनच महिन्यात काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं 30 मे रोजी निधन झालं. त्यामुळे चंद्रपूरची जागा रिक्त झाली. लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 151 अ नुसार खासदार किंवा आमदाराचं निधन झालं असेल किंवा अपात्र झाले असतील आणि ती जागा रिक्त झाली असेल तर त्याठिकाणी सहा महिन्याच्या आत निवडणूक व्हायला पाहिजे.
या कायद्याचा विचार केला तर गिरीश बापट यांचं निधन 29 मार्च 2023 मध्ये झालं. म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघात 28 सप्टेंबरपर्यंत निवडणूक लागायला हवी होती. पण, सप्टेंबर संपत आला तरी निवडणूक झाली नाही.
हे ही वाचा>> Maharashtra Political crisis: सुप्रीम कोर्टानं वापरलेले ‘हे’ दोन शब्द… अन् CM शिंदेंचं भवितव्य
दुसरं म्हणजे बाळू धानोरकर यांचं निधन 30 मे 2023 ला झालं. इथंही कायद्यानुसार 6 महिन्यांचा विचार केला तर नोव्हेंबर महिन्यात पोटनिवडणूक लागायला पाहिजे. पण, पुण्यातच पोटनिवडणूक लागली नाहीतर चंद्रपूरमध्ये पोटनिवडणूक कशी लागणार? निवडणूक आयोगाला चंद्रपुरात पोटनिवडणूक घ्यायची असती तर पुण्याचीही पोटनिवडणूक झाली असती.