Ravindra Chavan : “एकनाथ शिंदेंच्या बंडाचं भाजपने दिल्लीत केले प्लानिंग, फडणवीस होते…”
चव्हाण यांच्या गौप्यस्फोटाने शिवसेना फोडण्यामागे भाजपचा हात होता यावर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात असून, यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे.
ADVERTISEMENT
Eknath shinde Revolt big : ‘दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचा तीन वेळा प्रयत्न केले. 2019 मध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील काही आमदार यांना एकत्र करून उठाव करण्याचे नियोजनही झाले होते, मात्र तांत्रिक अडथळा आल्याने तो प्रयत्न फसला. अखेर 2022 मध्ये जूनचा महिना ठरला”, असा मोठा गौप्यस्फोट भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण यांच्या गौप्यस्फोटाने शिवसेना फोडण्यामागे भाजपचा हात होता यावर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात असून, यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. (Bjp Minister Ravindra chavan big revelation about eknath shinde revolt)
ADVERTISEMENT
‘दैनिक लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई ते सूरत आणि सूरत ते गुवाहाटी या सगळ्या प्रवासदरम्यान घडलेल्या पडद्यामागील घटनांचा उलगडा केला आहे.
मोबाईल काढून घेतले, टीव्हीही पाहू दिला नाही
रवींद्र चव्हाण यांनी वर्षभरापूर्वी घडलेल्या या राजकीय बंडाबद्दल काही गुपित उघड केली. ते म्हणाले, “सूरतला गेल्यावर आमदारांकडचे मोबाईल काढून घेतले होते. त्यांना टीव्ही सुद्धा बघू दिला नाही. गुवाहाटीला पोहोचल्यावरच आमदारांना टीव्ही बघायची परवानगी दिली. घरच्यांसोबत संपर्क करू दिला. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये छोटी चूक झाली असती, तरी हे ऑपरेशन सपशेल अपयशी ठरले असते. देशभर भाजपची नाचक्की झाली असती”, असा खळबळ उडवणारा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला.
हे वाचलं का?
हेही वाचा >> सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य उपमुख्यमंत्री, ठाकरे-पवार डीलमुळे शिवसेना फुटली?
शिंदेंच्या बंडाचं प्लानिंग दिल्लीतील नेत्यांचं
या बंडाबद्दल आणखी माहिती देताना रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे की, “दिल्लीतील नेत्यांनी महाराष्ट्रात अशा पद्धतीने ऑपरेशन लोटसचे तीन वेळा प्रयत्न केले. 2019 मध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील काही आमदार यांना एकत्र करून बंड करण्याचे नियोजन झाले होते. तांत्रिक अडथळा आला आणि तो प्रयत्न फसला. त्यानंतर कोविड आला. 2021 मध्येही प्रयत्न केला, पण वरिष्ठांनी परवानगी न दिल्याने रद्द केलं. 2022 मध्ये जून महिना ठरला आणि नियोजनही यशस्वी झाले. या सगळ्याचा अनुभव अविस्मरणीय असून, ते सगळे सांगणे अशक्य आहे.”
हेही वाचा >> Covid Centre scam : ठाकरेंच्या नेत्यांना अडचणीत आणणारं ‘हे’ प्रकरण काय?
देवेंद्र फडणवीस होते मार्गदर्शक
“सुरुवातीपासून 40 जण सोबत होते, पण त्यांना टप्प्यटप्प्याने बाहेर काढण्याचे नियोजन केले होते. जे काही घडलं, ते दिल्लीतून घडलं. त्याचे मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्याच नियोजनानुसार हे ऑपरेशन पार पडले”, अशी स्फोटक माहिती रवींद्र चव्हाण यांनी या मुलाखतीत बोलताना दिली.
ADVERTISEMENT
मविआतील 20 आमदार यायला तयार
इतकंच नाही, तर रवींद्र चव्हाण यांनीही असाही दावा केला आहे की, “महाविकास आघाडीतील आणखी 20 आमदार आमच्यासोबत यायला तयार होते. आता ते महाविकास आघाडीत असले, तरी मनाने युतीसोबत आहेत.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ‘शिवसेनेतून राणे गेले तेव्हाच बाहेर पडलो असतो..’, गुलाबराव पाटलांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंना भाजपच्या होत्या सूचना
रवींद्र चव्हाण म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी बंडाची आणि भाजपसोबत सुरू असलेल्या वाटाघाटींची कल्पना बराच काळ त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनाही दिली नव्हती. त्यांना गोपनीयता पाळण्याच्या सूचना भाजपनेच केल्या होत्या. त्यांनी त्या कसोशीने पाळल्या”, असा खुलासा चव्हाण यांनी केला आहे.
चालकालाही माहिती नव्हतं की,…
“ऑपरेशन लोटसबद्दल माहिती असलेल्या एक-दोन व्यक्ती होत्या. इतरांना केवळ त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदारीची माहिती दिली गेली होती. त्यामुळे आपण मोठ्या ऑपरेशनमध्ये जबाबदारी पार पाडत असल्याची त्यांना कल्पना नव्हती”, असंही चव्हाण यांनी सांगितलं.
“सोबत असलेल्या आमदारांना सुरतपर्यंत ते कोणत्या वाहनात बसले आहेत. वाहन कोण चालवतो आहे, याची माहिती नव्हती. वाहन चालवणाऱ्यालाही वाहनात कोण बसले आहे, याची कल्पना नव्हती. कुणी वेशांतर करून तर कुणी पोलिसांच्या बंदोबस्तात वसईमार्गे सुरतला पोहोचले. त्या हॉटेलमधील कडक सुरक्षा बघितल्यावर आमदारांना आपण मोठ्या बंडांचा भाग असल्याचे कळले”, अशी माहिती चव्हाणांनी दिली.
सुरतमध्ये घेतली अंतर्वस्त्र
चव्हाणांनी या मुलाखतीत असंही सांगितलं की, “आमदार अंगावरील कपड्यानिशी सुरतला पोहोचले होते. सुरतला गेल्यावर त्यांना कळले की, आपल्याला अनेक दिवस राहावं लागणार आहे. त्यानंतर त्यांनी कपडे आणि अंतर्वस्त्र घेतली”, असं चव्हाण यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT