राऊतांना बाळासाहेब म्हणाले, ‘चुपचाप काम कर…’ निरुपमांनी सांगितला राज्यसभा निवडणुकीचा ‘तो’ किस्सा

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Sanjay Nirupam Mumbai Tak Chawadi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) जागावाटपावरून महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार जुंपली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 23 जागांचा दावा केल्यानंतर संजय निरूपमांना (Sanjay Nirupam) मुंबईतील 3 जागांवर दावा सांगितला होता. यावरून दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर निशाणा साधला जातोय. असे असतानाच आता आधी शिवसेनेत असलेले वर नंतर काँग्रेसमध्ये सामील झालेल्या संजय निरूपमांनी आता मुंबई Tak चावडीला भेट दिली आहे. या भेटीत त्यांनी चावडीवर अनेक राजकीय किस्से आणि खळबळजनक खुलासे केले आहेत. यातील एक किस्सा त्यांनी दिवंगत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या राज्यसभेच्या संधीचा सांगितला आहे. (sanjay nirupam mumbai tak chawadi told the rajyasabha election story sanjay raut balasaheb thackeray)

मुंबई तक चावडीवर बोलताना संजय निरूपम म्हणाले की, 2000 मध्ये मी पुन्हा राज्यसभेवर गेलो. म्हणजे पहिली टर्म 4 वर्षांचीच होती, ती पोटनिवडणूक होती. सुरेश कलमाडीमुळे झाली होती. सुरेश कलमाडी राज्यसभेचे सदस्य होते. 1996 मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून उभे होते, त्यामुळे एक जागा रिकामी झाली. शिवसेनेने ही जागा मागितली आणि भाजपने ती दिली.

हे ही वाचा : शरद मोहोळ खून प्रकरणात दोन वकिलांचा हात, हत्याकांडात नेमका काय होता रोल?

जेव्हा मला पुन्हा संधी दिली जाणार होती, त्याच्या एक आठवडा आधी उद्धव ठाकरे रणथंबोरला वाघांचे फोटो काढण्यासाठी जात होते. त्यांनी मलाही आग्रह केला, ‘तुम्ही येणार का?’ मिलिंदजीही होते सोबत. मग म्हणालो की ठिक आहे. तीन दिवस आम्ही सोबत होतो. फक्त वाघ, खाणं एवढंच तिकडे झालं, मी राज्यसभेचा विषयही काढला नव्हता असे निरूपम यांनी सांगितले. त्यानंतर रणथंबोरहून परत आल्यानंतर मराठी वर्तमानपत्रांमध्ये छापून आलं की, संजय निरुपमने राज्यसभेची जागा निश्चित केली. उद्धवजींसोबत बोलणी केली. मी उद्धवजींना म्हणालो की, मी काही बोललो का? ते म्हणाले, ‘तुम्ही काही म्हणाला नाहीत, पण छापताहेत, छापू द्या.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान 2000 मध्ये माझी राज्यसभेची टर्म संपल्यानंतर की त्यापूर्वी मला नक्की आठवत नाही, पण बाळासाहेब मला म्हणाले होते की, आला होता तो राऊत (संजय राऊत). मला म्हणाला की, तुम्ही मला राज्यसभेत पाठवा. मी त्याला सांगितलं की, आता नाही. निरूपमला पाठवायचं. तर तो (संजय राऊत) म्हणाला की मी काय सामनात लिहित बसू का? मी त्याला बोललो की, तुला सामनात राज्यसभेत पाठवण्यासाठी आणलं होतं का? चुपचाप काम कर’, असं मला बाळासाहेबांनी सांगितलं होतं. मी त्याच्यात कधी पडलो नाही”, असा भन्नाट किस्सा आता संजय निरूपम यांनी सांगितला आहे.

हे ही वाचा : नवऱ्याच्या मृत्यूचा धसका घेत पत्नीचं सुसाईड, अंत्यसंस्कारानंतर वेगळंच सत्य आलं समोर

    follow whatsapp

    ADVERTISEMENT