Women Reservation Bill : ‘विधेयकाला पाठिंबा, पण…’, सोनिया गांधी काय म्हणाल्या?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

Lok Sabha Debate : sonia gandhi speech women reservation bill congress support parliament special sesssion day 2
Lok Sabha Debate : sonia gandhi speech women reservation bill congress support parliament special sesssion day 2
social share
google news

Women Reservation Bill Parliament Special Sesssion : नव्या संसदेच्या कामकाजाचा आज दुसरा दिवस सुरू आहे. लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर तब्बल 7 तास चर्चा होणार आहे. या चर्चे दरम्यान काँग्रेस खासदार सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. या घोषणेसह सोनिया गांधी यांनी हे महिला आरक्षण विधेयक तातडीने मंजूर करावे, अशी देखील मागणी केली.  (sonia gandhi speech women reservation bill congress support parliament special sesssion day 2)

महिला आरक्षणावर विधेयकाच्या चर्चेदरम्यान कायदा मंत्री अर्जुन मेघवाल (Arjun Meghawal) यांनी लोकसभेत या विधेयकातील तरतुदींची माहिती दिली. यानंतर काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकाला (Women Reservation Bill)  काँग्रेस पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच मी या विधेयकाच्या पाठिंब्यासाठी उभी आहे, असे सोनिया गांधी यांनी लोकसभेत सांगितले.

हे ही वाचा : Rain Update : राज्यात पुढचे तीन दिवस पाऊस, पण मराठवाड्यात…

माझ्या आयुष्यातील हा एक मार्मिक काळ आहे.कारण पहिल्यांदा निवडणुकांमध्ये महिलांचा सहभाग आणणारे विधेयक माझे पती राजीव गांधी यांनी आणले होते. आज त्याचा परिणाम म्हणजे देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून 15 लाख महिला नेत्या निवडून आल्या आहेत, पण राजीव गांधींचे स्वप्न अर्धेच पूर्ण झाले आहे, ते या विधेयकाच्या मंजूरीमुळे आता पूर्ण होणार आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काँग्रेस पक्षाचा या विधेयकाला पाठिंबा आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत, पण चिंता देखील आहे, असे म्हणत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला सवाल केला आहे. महिला गेल्या 13 वर्षांपासून राजकीय जबाबदारीची वाट पाहतायत. सध्या त्यांना जास्त वेळ थांबायला लावले जात आहे. 2 वर्षे, 4 वर्षे, 6 वर्षे…त्यामुळे महिलांनी किती प्रतीक्षा करावी? असा सवाल सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला केला. तसचे हे महिला आरक्षण विधेयक तातडीने मंजूर करावे, अशी आमची मागणी असल्याचे देखील सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

तसते जातीची जनगणना करून एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाची व्यवस्था करावी. त्यासाठी आवश्यक ती पाऊले सरकारने उचलली पाहिजेत. या विधेयकाला आणखीण उशीर हा केल्यास महिलांवर अन्याय ठरेल असे देखील सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Hardeep Singh Nijjar : कोण होता खलिस्तानी दहशतवादी? ज्याच्या हत्येने भारत-कॅनडा संबंध झाले खराब

    follow whatsapp

    ADVERTISEMENT