Uddhav Thackeray : अदाणींना विरोध… ठाकरे काँग्रेससोबत, पण राजकारण काय?
मुंबई अदाणींच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. पण, या मागील राजकीय समीकरणं काय आहेत? तेच जाणून घ्या.
ADVERTISEMENT
Dharavi Redevelopment Project : शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरेंनी शिंदे सरकार आणि अदाणींवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या १६ डिसेंबरला अदाणींच्या कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. अदानींच्या प्रकरणात आक्रमक असलेल्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे देखील एकत्र आल्याचे दिसत आहेत. उद्धव ठाकरे अदानींच्या विरोधात भूमिका का घेतायेत? त्याच्यामागे राजकारण नेमकं काय आहे हेच आपण समजावून घेऊयात…
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत अदाणींवर तोफ डागली. त्याचबरोबर धारावीचा विकास करताना तेथील रहिवाशांना तेथेच घरं द्यावी, अशी मागणीही केली. त्याचबरोबर अदाणींना देण्यात येणाऱ्या टीडीआरचा सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी देखील ठाकरेंनी केली. मुंबई तुम्ही एकाच्या घशात घालायला निघाला आहात, असेही ठाकरे म्हणाले.
काँग्रेस उचलला मुद्दा, ठाकरेंही आक्रमक
अदाणींच्या कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सर्व मुंबईकरांनी सहभागी व्हावं, असं आवाहन देखील ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत केलं. धारावीचा पुनर्विकास करण्याचं काम सरकारकडून अदाणींना देण्यात आलं आहे. या बदल्यात सरकार मुंबईत इतर ठिकाणी अदाणींना टीडीआर देखील देणार आहे. अदाणींना देण्यात येणारा टीडीआर हा महाघोटाळा आहे, असा आरोप सातत्याने काँग्रेसच्या धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड करत आहेत. हे टीडीआर देणं म्हणजे मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटचा एकहाती ताबा हा अदाणींना देणं आहे, असा आरोप वर्षा गायकवाड सातत्याने करताहेत.
हे वाचलं का?
२६ नोव्हेंबरला वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मोर्चा देखील काढण्यात आला होता. त्यापूर्वी वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी उद्धव ठाकरेंचे धारावीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.
हेही वाचा >> केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या 10 खासदारांचे राजीनामे, कारण…
आता उद्धव ठाकरे यांनी देखील धारावीच्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे अदानीच्या प्रकरणात काँग्रेससोबत नेमके का आहेत हे समजावून घेणं महत्त्वाचं आहे. धारावी जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. जवजवळ पावणे तीन किलोमीटरच्या परिसरात धारावी पसरली आहे. या धारावी परिसरात तब्बल १० लाख लोक राहत असल्याचं अनेक रिपोर्ट्स मधून समोर आलं आहे. धारावी हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.
ADVERTISEMENT
जर टीडीआर बँक करणार असाल तर ती सरकारची असावी pic.twitter.com/8n3g9kKPlW
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 5, 2023
ADVERTISEMENT
धारावीचा पुनर्विकास आणि राजकीय गणितं
१९९९ ते २००४ काँग्रेसचे एकनाथ गायकवाड हे इथले आमदार होते. त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड या इथल्या आमदार झाल्या. १९८५ ते १९९० या काळात देखील एकनाथ गायकवाड हे धारावीचे आमदार राहिले आहेत.
धारावी हा विधानसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघात येतो. वर्षा गायकवाड धारावीच्या आमदार झाल्यानंतर एकनाथ गायकवाड हे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार झाले होते. २०१४ मध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे मोदी लाटेमध्ये इथे खासदार म्हणून निवडूण आले.
हेही वाचा >> महंत बालमुकुंद हरता हरता जिंकले, काय झालं 19व्या फेरीत
२०१९ ला देखील शेवाळेंना हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात यश आलं. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शेवाळे हे शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे ठाकरेंसाठी ही जागा रिकामी झाली आहे. त्यातच मुंबईच्या मध्यात असणारा हा महत्त्वाचा मतदारसंघ ठाकरेंना हातचा जाऊ द्यायचा नाहीये.
धारावीचा मतदार मोठा आहे. त्यामुळे धारावीचा प्रश्न हाती घेऊन एकप्रकारे उद्धव ठाकरेंची लोकसभेची तयारी सुरु आहे. शेवाळेंच्या विरोधात कोणाला उतरवायचं याबाबतची देखील चाचपणी ठाकरेंकडून सुरु आहे.
त्यातच अदाणींना देण्यात येणारा टीडीआर अदाणी मुंबईमध्ये कुठल्याही भागात वापरु शकणार आहेत. त्यामुळे त्यांना त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >> Sukhdev Singh Gogamedi Murder: …त्यालाही घातल्या गोळ्या, शेवटच्या 10 मिनिटांत काय घडलं?
जे मुंबईप्रेमी आहेत, त्यांनी १६ तारखेला एकत्र या! pic.twitter.com/b2zccuYn4u
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 5, 2023
आता टीडीआर म्हणजे नेमकं काय हे समजावून घेऊयात
टीडीआर म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स. टीडीआर हा महापालिकेकडून विकासकाला दिला जातो. टीडीआरच्या माध्यमातून विकासकाला जास्तीचे बांधकाम करता येते. त्याचबरोबर हा टीडीआर एखाद्या दुसऱ्या विकासकाला देखील विकता येतो.
आता असा टीडीआर हा धारावीच्या पुनर्विकासाच्या बदल्यात अदाणींना मिळणार आहे. त्यामुळे या टीडीआरचा सरकारने हिशोब द्यावा अशी मागणी आता ठाकरे करत आहेत. त्यामुळे अदाणींच्या प्रकरणात ठाकरे हे काँग्रेसच्यासोबत उतरल्याचं चित्र आहे. आता १६ तारखेच्या मोर्चानंतर पुढे कुठला कार्यक्रम हाती घेणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT