उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसमोर खरोखरच पत्करली राजकीय शरणागती?

साहिल जोशी

महाविकास आघाडी तुटण्यापासून वाचविण्यासाठी शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहेत

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray come in the mode of 'complete political surrender' to Sharad Pawar
Uddhav Thackeray come in the mode of 'complete political surrender' to Sharad Pawar
social share
google news

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच मोठी उलथापालथ होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे राज्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. त्याचं झालयं असं की, 2024 मध्ये विरोधी ऐक्याचे मॉडेल म्हणून समोर आलेली महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) चहुबाजूंनी अडचणीत सापडलेली दिसत आहे आणि या संपूर्ण राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. (Uddhav Thackeray come in the mode of ‘complete political surrender’ to Sharad Pawar)

शरद पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री पदासाठी बंड करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. अशात महाविकास आघाडीबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांची राजकीय भूमिकाही बदलताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटण्यापासून वाचविण्यासाठी शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिंदे-भाजपमुळे राज्याची सत्ता आणि पक्ष गमावलेले उद्धव ठाकरे आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी सध्याच्या घडीला पवार कुटुंबाला सारी ‘राजकीय सत्ता’ देण्यास तयार झाल्याचं दिसत आहे. मात्र यामुळे उद्धव ठाकरे पवारांपुढे ‘संपूर्ण शरणागती’ च्या मुद्रेत आले आहेत का? असा सवाल विचारला जात आहे.

पवार घराण्याचा पॉवर गेम

खरंतर, अजित पवार अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा बाळगून आहेत आणि त्यांच्या याच इच्छेला भाजपकडून हवा मिळत असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, या खटल्याचा निकाल कधीही येण्याची शक्यता आहे. हा निर्णय उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेल्यास आणि आमदारांचे सदस्यत्व रद्द झाल्यास शिंदे-भाजप सरकार अल्पमतात येईल, असं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का.. मुख्यमंत्री बदलणार?, शरद पवार म्हणाले; मला…

यामुळे उद्धव ठाकरे राज्यात मुदतपूर्व निवडणुकीवर भाष्य करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपनेही राजकीय डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. या सगळ्यामुळे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र राहणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp