Maharashtra Assembly: विरोधी पक्षनेता ठरला! काँग्रेसने नावावर केले शिक्कामोर्तब

साहिल जोशी

विजय नामदेवराव वडेट्टीवार हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात त्यांना लोकांचा चांगला पाठिंबा आहे. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी ते शिवसेनेकडून आमदार होते.

ADVERTISEMENT

congress elected vijay wadettiwar name for opposition leader of maharashtra assembly.
congress elected vijay wadettiwar name for opposition leader of maharashtra assembly.
social share
google news

Vijay Wadettiwar news : विरोधी पक्षनेते असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाल्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची जागा रिक्त झाली होती. राष्ट्रवादीचं संख्याबळ घटल्याने विधानसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होईल, हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर आता काँग्रेसने निर्णय घेतला असून, विजय वडेट्टीवार हे यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेब थोरात हे विधिमंडळ पक्षनेते पदी कायम राहणार आहेत. (Congress elected Vijay Wadettiwar as opposition leader of Maharashtra legislative assembly.)

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी अजित पवार यांच्यावर देण्यात आली होती. मात्र, 2 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांच्या गटाने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली बंड केलं. अजित पवार भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सामील झाले आणि उपमुख्यमंत्री बनले. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते.

विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार दोन गटात विभागले गेले. विधानसभेत विरोधी बाकांवर सर्वाधिक आमदार असलेला काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांचाच विरोधी पक्षनेता होईल, हे स्पष्ट झाले होते. विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमधील अनेक नेत्यांची नावं स्पर्धेत होती. यात काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी वर्णी लागू शकते, असं म्हटलं गेलं होतं. काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरातांनी याला दुजोरा दिला होता. विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवडले जायला हवे. कारण त्यांना इतर सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp