पाकिस्तान भारताला ज्याची धमकी देतोय, तो शिमला करार नेमका काय?

मुंबई तक

Shimla Agreement Explain : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची (एनएससी) आपत्कालीन बैठक बोलावली. यावेळी त्यांनी भारताने आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आणि शिमला करार स्थगित केला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारताचा काश्मीरला मोठा दणका

point

पाकिस्तानचीही भारताला शिमला करार रद्द करण्याची धमकी

point

काय आहे शिमला करार?

Simla Agreement : जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देश हादरला. त्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही एकामागून एक प्रत्युत्तरात्मक पावलं उचलली आहेत. यामध्ये वाघा सीमा बंद करणं, सार्क व्हिसा सुविधा स्थगित करणं आणि भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे यासारखे निर्णय समाविष्ट आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची (एनएससी) आपत्कालीन बैठक बोलावली. पाकिस्तानने यामध्ये अनेक निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने भारतावर आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आणि शिमला करार स्थगित केला. पाकिस्तानने म्हटले आहे की, शिमला करारासह भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित केले जाऊ शकतात. 

हे ही वाचा >> Maharashtra Weather : विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची लाट, तर 'या' तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळीची शक्यता

पाकिस्तानच्या या धमकीनंतर, शिमला करार पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील निर्णायक युद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी 1972 मध्ये यावर स्वाक्षरी करण्यात आली होती. पण अनेकांना प्रश्न पडला असेल की,  शिमला करार म्हणजे काय? त्याचं महत्त्व काय आहे? आज ही चर्चा का होतेय? सविस्तरपणे समजून घेऊ काय आहे शिमला करार.

शिमला कराराची पार्श्वभूमी: 1971 चे युद्ध

1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तानच्या (आजच्या बांगलादेश) स्वातंत्र्यासाठी युद्ध झाले. पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानमध्ये प्रचंड अत्याचार केले होते, त्यामुळे लाखो लोक आश्रय घेण्यासाठी भारतात आले. प्रत्युत्तरादाखल, भारताने हस्तक्षेप केला आणि पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp