Karnataka Election Result : भाजपला ‘या’ चुका भोवल्या, पराभवाची 6 कारणे
Karnataka Assembly election Result 2023 : आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकालाचा दिवस आहे. कर्नाटकातील 36 मतमोजणी केंद्रांवर 224 विधानसभा मतांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या कलामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (BJP) पराभव करून काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेवर येताना दिसत आहे. आतापर्यंतच्या समोर आलेल्या कलानुसार भाजप 70 पेक्षा कमी जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटक निवडणुकीच्या निकालात काँग्रेस स्पष्ट […]
ADVERTISEMENT

Karnataka Assembly election Result 2023 : आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकालाचा दिवस आहे. कर्नाटकातील 36 मतमोजणी केंद्रांवर 224 विधानसभा मतांची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या कलामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा (BJP) पराभव करून काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेवर येताना दिसत आहे. आतापर्यंतच्या समोर आलेल्या कलानुसार भाजप 70 पेक्षा कमी जागांवर आघाडीवर आहे.
कर्नाटक निवडणुकीच्या निकालात काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. काँग्रेसने 3 जागांवर विजय मिळवला असून, 128 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या विजय-पराजयाच्या कारणांचीही चर्चा सुरू झाली आहे. कर्नाटकात भाजपच्या लाजिरवाण्या पराभवामागे मजबूत चेहऱ्याचा अभाव आणि राजकीय समीकरणे सांभाळण्यात आलेले अपयश ही प्रमुख कारणे आहेत.
कर्नाटकात मजबूत चेहऱ्याचा उणीव
कर्नाटकमध्ये भाजपच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे मजबूत चेहऱ्याची अनुपस्थिती. येडियुरप्पा यांच्या जागी भाजपने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री बनवले, पण मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असतानाही बोम्मई यांचा विशेष प्रभाव पडला नाही. तर काँग्रेसकडे डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्यासारखे मजबूत चेहरे होते. बोम्मई यांना पुढे करणे भाजपला महागात पडले.
हेही वाचा >> Karnataka election results live : काँग्रेस ‘किंग’! कर्नाटक भाजपच्या हातून निसटलं
कर्नाटक निवडणुकीत भ्रष्टाचार ठरला कळीचा मुद्दा
भ्रष्टाचार हा मुद्दाही भाजपच्या पराभवामागे मुख्य कारण ठरला. काँग्रेसने सुरुवातीपासूनच भाजपच्या विरोधात ’40 टक्के वेतन-मुख्यमंत्री भ्रष्टाचार’ हा अजेंडा ठरवला आणि तो हळूहळू मोठा मुद्दा बनला. एस ईश्वरप्पा यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि भाजपच्या एका आमदाराला तुरुंगात जावे लागले. राज्य कंत्राटदार संघटनेने पंतप्रधानांकडे तक्रारही केली होती. निवडणुकीतही हा मुद्दा भाजपच्या गळ्यातला बनल्याचं दिसलं आणि त्यावर पक्षाला तोडगा काढता आला नाही.