विधान परिषद 2023: मी नॉट रिचेबल का होते ते वेळ आल्यावर..: शुभांगी पाटील
नाशिक: नाशिक (Nashik) पदवीधर विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. खरं तर या मतदारसंघात एकाही पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. येथील सर्वच उमेदवार हे अपक्ष आहेत. मात्र, असं असूनही अवघ्या महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष या निवडणुकीकडेच लागून राहिलं आहे. कारण की आता बलाढ्य उमेदवार समजले जाणारे सत्यजीत तांबे (Satyajeet) यांना अपक्ष शुभांगी […]
ADVERTISEMENT

नाशिक: नाशिक (Nashik) पदवीधर विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. खरं तर या मतदारसंघात एकाही पक्षाचा अधिकृत उमेदवार नाही. येथील सर्वच उमेदवार हे अपक्ष आहेत. मात्र, असं असूनही अवघ्या महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष या निवडणुकीकडेच लागून राहिलं आहे. कारण की आता बलाढ्य उमेदवार समजले जाणारे सत्यजीत तांबे (Satyajeet) यांना अपक्ष शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या टक्कर देणार आहेत. (vidhana parishad election 2023 why i was not reachable when the time came shubhangi patil)
सत्यजीत तांबे यांना सहजपणे विजय मिळवता यासाठी त्यांनी आणि भाजपने अप्रत्यक्षरित्या बरेच प्रयत्न केले. शुभांगी पाटील यांनी आपला निवडणूक अर्ज मागे घ्यावा यासाठी बरेच प्रयत्न केले गेले. मात्र, शुभांगी पाटील या निवडणूक लढवण्यावर ठाम होत्या. म्हणून आजच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत नॉट रिचेबल (not reachable) होत्या. पण याचबाबत नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी एक मोठा दावा केला आहे.
‘मी आज नॉट रिचेबल का होते ते वेळ आल्यावर सांगेन. काही तरी असल्याशिवाय व्यक्ती नॉटरिचेबल नसतो. हे तुम्हालाही माहिती आहे.’ असं शुभांगी पाटील यावेळी म्हणाल्या. त्यामुळे आता त्यांच्या नॉटरिचेबल असण्याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत.
विधान परिषद: सत्यजीत तांबेंना भिडणारी ‘वाघिण’; कोण आहेत शुभांगी पाटील?