Prakash Ambedkar : …म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित आघाडीला सोबत घेत नाहीये

राहुल गायकवाड

इंडिया आघाडी बैठक मुंबई : वंचित बहुजन आघाडीला बैठकीचं निमंत्रण दिले गेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा वंचितला विरोध असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीये.

ADVERTISEMENT

prakash ambedkar vs sharad pawar : why india alliance not invited to vanchit bahujan aghadi
prakash ambedkar vs sharad pawar : why india alliance not invited to vanchit bahujan aghadi
social share
google news

India Alliance Meeting : PM नरेंद्र मोदींच्या विरोधात देशातील 28 पक्ष एकत्र आले आहेत. या 28 पक्षांची इंडिया नावाची आघाडी अस्तित्वात आली आहे. आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजप प्रणित एनडीएचा पराभव करण्यासाठी या पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मोदी आणि भाजपच्या विरोधात लढताना मतांचं विभाजन होऊ नये, यासाठी इंडिया आघाडी एकत्रित निवडणुकांना सामोरी जाणार आहे. अशातच एकत्र आलेल्या 28 पक्षांबरोबरच इतर छोटो मोठे पक्ष देखील या आघाडीत सामील व्हावेत असा प्रयत्न आहे.

आता प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला देखील इंडिया आघाडीत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. उद्धव ठाकरेंनी इंडियाच्या पत्रकार परिषदेत ‘आम्ही प्रकाश आंबेडकरांना इंडियामध्ये घ्यायला तयार आहोत, त्यांना यायचं आहे का हे विचारावं लागेल?’ असं वक्तव्य केलं होतं. असं असलं तरी वंचित बहुजन आघाडी इंडियामध्ये येण्यास तयार आहे परंतु त्याबाबतचं कुठलंही अधिकृत निमंत्रण देण्यात आलं नसल्याचं वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केलं आहे.

त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीला इंडियामध्ये सामिल करुन घेण्यात नेमक्या अडचणी कुठल्या अडचणी आहेत? हा कळीचा मुद्दा आहे आणि तोच आपण समजावून घेऊयात….

जानेवारीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेत युती झाली. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली होती. असं असलं तरी वंचितला महाविकास आघाडीमध्ये सहभागी करुन घेण्यात आलं नव्हतं. आता मोदींच्या विरोधात आघाडी होत असताना वंचितला अजूनही एकत्र येण्याबाबत निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला वंचित का नकोय?

वंचितची जरी शिवसेनेसोबत युती असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वंचितला सोबत घेण्याबाबत फार अनुकूल नाहीये. याची कारणं गेल्या निवडणुकीमध्ये आणि या आधीच्या राजकारणामध्ये दडली आहे. 2019 च्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी एकत्र लढल्या. 2019 च्या निवडणुकांमध्ये वंचितने मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन वातावरण निर्माण केलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp