IPL 2021 : T-20 क्रिकेटमध्ये कॅप्टन कोहलीची धाकड कामगिरी, शिरपेचात मानाचा तुरा

मुंबई तक

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात खेळत असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने धडाकेबाज कामगिरी करुन दाखवली आहे. विराट कोहलीने टी-२० क्रिकेट प्रकारात १० हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा विराट पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात १३ धावा काढून त्याने ही कामगिरी करुन दाखवली. आतापर्यंत ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, शोएब मलिक आणि […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात खेळत असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने धडाकेबाज कामगिरी करुन दाखवली आहे. विराट कोहलीने टी-२० क्रिकेट प्रकारात १० हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा विराट पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात १३ धावा काढून त्याने ही कामगिरी करुन दाखवली.

आतापर्यंत ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, शोएब मलिक आणि डेव्हीड वॉर्नर या खेळाडूंनाच अशी कामगिरी जमली आहे.

विराट कोहलीने जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत १० हजार धावा पूर्ण केल्या. या सामन्यापूर्वी १० हजार धावा करण्यासाठी त्याला १३ धावांची आवश्यकता होती. विराट कोहलीनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर ९,३४८ धावा आहेत. तर सुरेश रैनाच्या नावावर ८,६३२ धावा आहेत. रोहित शर्माने ३५१ सामन्यात ३३८ डावात ९,३४८ धावा केल्या आहेत. या दरम्यान रोहितच्या नावावर सहा शतक आणि ६५ अर्धशतकांचा समावेश आहे.

IPL 2021 : CSK ची गाडी सुस्साट, अटीतटीच्या लढतीत KKR वर मात

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील टी २० स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  • ख्रिस गेल- १४,२६१ धावा

  • किरोन पोलार्ड- ११,१७४ धावा

  • शोएब मलिक- १०,८०८ धावा

  • डेविड वॉर्नर- १०,०१७ धावा

  • विराट कोहली- १०,०००* धावा

  • हे वाचलं का?

      follow whatsapp