Namibian cheetah Sasha: कुनो नेशनल पार्कातील साशा चित्त्याचा मृत्यू कशामुळे झाला?

मुंबई तक

Namibian cheetah Sasha Dies in kuno national park : नामशेष झालेल्या चित्ता पुन्हा भारतात वाढवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या चित्ता प्रोजेक्टमधून एक वाईट बातमी आली. खुल्या जंगलात सोडण्यात आलेल्या चित्त्यांपैकी एका मादीचा मुत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

Namibian cheetah Sasha Dies in kuno national park
Namibian cheetah Sasha Dies in kuno national park
social share
google news

cheetah died in india : भारतात नामशेष झालेली चित्ता प्रजाती वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असून, यासाठी नामिबियातून चित्ते आणण्यात आले आहेत. हाती घेण्यात आलेल्या चित्ता प्रोजेक्ट पहिला धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील श्योपूर स्थित असलेल्या कुनो राष्ट्रीय अभरण्यात सोडण्यात आलेल्या चित्त्यांपैकी एका मादीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (27 मार्च) रात्री चित्ता मादीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचं कारण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आलेल्या साशा नावाच्या चित्ता मादीचा मृत्यू झाला आहे. कुनो प्रशासनाकडून याची माहिती देण्यात आली. भारतात आणण्यापूर्वी साशा किडनीच्या व्याधीमुळे त्रस्त होती. नामिबियामध्ये तिची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. दरम्यान, साशाचं शवविच्छेदन करून अभयारण्या प्रशासनाकडून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साशा चित्त्याचा मृत्यू : कुनो राष्ट्रीय अभयारण्य प्रशासनाने काय सांगितले?

श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात चित्ता प्रोजेक्ट सुरू आहे. भारतातील चित्त्याचं घर बनलेल्या या अभयारण्यात नामिबियातून 8, तर दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणण्यात आले आहेत. या चित्त्यांना परदेशातून आणल्यानंतर सुरूवातील विलगीकरणात ठेवले गेले. त्यानंतर जंगलात सोडले जात होते. त्याच दरम्यान साशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

हेही वाचा – भारतात आणलेल्या चित्त्यांमागचं नागपूरमधलं मराठी कनेक्शन माहित आहे का?

साशा चित्ता मादी आजारी असल्याचे लक्षणे जानेवारी 2022-23 दिसून आली होती. त्यानंतर तिला मोठ्या बंदिस्त जागेतून छोट्या बंदिस्त जागेत हलवण्यात आले होते. साशा काहीही खात नव्हती आणि शांत शांत राहत होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp