बायकोचा शरीरसंबंधासाठी आग्रह, पती संतापला; बायकोच्या गुप्तांगावर सिगारेटने...., पुण्यातील संतापजनक घटना
Pune Crime : बायकोचा शरीरसंबंधासाठी आग्रह, पती संतापला; बायकोच्या गुप्तांगावर सिगारेटने चटके दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायकोचा शरीरसंबंधासाठी आग्रह,
पती संतापला; गुप्तांगावर सिगारेटने चटके दिले.
पुण्यातील संतापजनक घटना
Pune Crime : पुण्यात वैवाहिक आयुष्यातील मतभेदातून संतापाची परिसीमा गाठणारी एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. शरीरसंबंधाची मागणी केल्यावर पतीनेच पत्नीवर अत्याचार करत तिच्या गुप्तांगावर तसेच मांडीवर सिगारेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी पीडितेने येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेची पार्श्वभूमी
तक्रारदार 29 वर्षीय महिलेचा विवाह 11 एप्रिल 2025 रोजी येरवड्यातील 33 वर्षीय पुरुषाशी मुस्लिम पद्धतीने झाला. लग्नानंतरच्या पहिल्याच रात्रीपासून पतीचा व्यवहार संशयास्पद होता. हनिमून नाइटला तो “खूप थकलो आहे” असे सांगत झोपी गेला. पुढील काही दिवस पत्नीने पती नैसर्गिकरित्या पुढाकार घेईल, अशी अपेक्षा ठेवून वाट पाहिली. मात्र, पती तिच्यासोबत झोपला तरी शारीरिक नातेसंबंध ठेवण्यापासून तो सातत्याने दूर पळत होता.
पत्नीने सौम्यपणे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असता तिला लक्षात आले की पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे संकेत दिसत आहेत. तिने त्याला वैद्यकीय उपचारांचा सल्ला दिला असता पतीने “मी आधीच डॉक्टरांना दाखवलंय, काही प्रॉब्लेम नाही” असे सांगून उपचारांना नकार दिला. पुढेही पत्नीने पुढाकार घेताच तो खोलीतून बाहेर पडून घराबाहेर झोपत असे. हा प्रकार दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू होता.
सासरकडून उलट धमक्या
पतीच्या या विचित्र वर्तणुकीबाबत तिने सासरच्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र मदतीऐवजी “हे बाहेर कुणाला सांगू नको” अशी तिला उलट धमकी देण्यात आली. पुन्हा तिने तक्रार केल्यावर तिच्यावर मानसिक छळ वाढविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केली असता “लग्न झालंय, निभावून न्यायचं” अशी सक्ती करण्यात आली.










