Love Story : ट्यूशनला जाणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडला सिक्युरिटी गार्ड; पळून जातं थाटला संसार
आसाममध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने त्यांची लव्ह स्टोरी जगासमोर आणली आहे. कधीकाळी पेशाने सिक्युरीटी गार्ड राहिलेल्या सोनू छेत्री आणि ईशा यांची ही लव्ह स्टोरी आहे.
ADVERTISEMENT

Love Story :
आसाममध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने त्यांची लव्ह स्टोरी जगासमोर आणली आहे. कधीकाळी पेशाने सिक्युरीटी गार्ड राहिलेल्या सोनू छेत्री आणि ईशा यांची ही लव्ह स्टोरी आहे. सोनू छेत्री आजच्या घडीला प्रसिद्ध यु-ट्यूबर असून त्याच्या Sonu Vlogs नावाच्या चॅनेलला तब्बल 5 लाख सबस्क्राईबर आहेत. (The security guard fell in love after seeing the girl going for tuition, both eloped and got married)
कधी फुलली सोनू-ईशाची लव्ह स्टोरी?
सोनू छेत्रीने व्हिडीओमध्ये सांगितलं की, ट्यूशनला जाताना त्याने ईशाला पहिल्यांदा पाहिलं. ईशाला पाहताच पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. व्हिडिओमध्ये सोनू म्हणाला- एक दिवस मी माझ्या मावशीच्या घरी आलो होतो. ईशाही त्याच गावात राहायची. एके दिवशी ती संध्याकाळी ट्यूशनला जात होती. त्यावेळी मी तिला पाहिलं आणि पहिल्याच नजरेत प्रेमात पडलो.
हेही वाचा : ब्रेकअप झालं? निराश होऊ नका… सरकार करणार तरुणांना मदत
तर ईशाने सांगितलं की, तिने सोनूला पहिल्यांदा क्रिकेट खेळताना पाहिलं होतं. सोनूने व्हिडिओमध्ये सांगतो की, तिच्या नातेवाईकांनीही ईशाचं कौतुक केलं होतं. ईशा खूप छान मुलगी आहे, तू तिच्याशी लग्न कर, असंही सांगितले होतं, त्यानंतर त्याने आपण ईशाशीच लग्न करणार असल्याचं ठरवलं होतं.