RPF Constable : “मनोरुग्ण निवडून माणसं मारतो का?”, जितेंद्र आव्हाडांचा चढला पारा
जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवान चेतन सिंह याने गोळीबार केला. यात चार जणांचा मृत्यू झाला. याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत.
ADVERTISEMENT
RPF Constable Chetan : 31 जुलै रोजी मुंबईकडे येत असलेल्या जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये भयंकर हत्याकांड घडलं. रेल्वे दलाच्या जवानाने एका वरिष्ठ सहकाऱ्यासह तीन जणांची गोळ्या घालून हत्या केली. अंदाधूंद गोळीबार करणारा चेतन सिंह हा मानसिक रुग्ण असल्याचे रेल्वे पोलीस दलाकडून सांगण्यात आले. पण, यावरूनच जितेंद्र आव्हाडांचा पारा चढला. आमदार आव्हाडांनी काही प्रश्न या घटनेवरून उपस्थित केले असून, याची उत्तरं कोण देणार? असा सवाल आव्हाडांनी केला आहे.
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून, या घटनेबद्दल काही शंका उपस्थित केल्या आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणतात, “चेतन सिंह ह्याने जो काल गोळीबार केला; त्यामध्ये आचार्य नावाच्या त्याच्या सहकार्याने दिलेल्या जबाबामध्ये त्याने टिकाराम यांच्याशी वादविवाद केल्याचे सांगितले. हे सगळं जवळ-जवळ अर्धा तास चालू होतं.”
वाचा >> Firing: ‘ये सब PAK से ऑपरेट हैं…’, जयपूर-मुंबई ट्रेनमधील ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
“त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही, असं पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितलं. हे कशावरुन पोलिसांनी शोधून काढलं. जर त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही हे जर माहिती होत, तर त्याला कामावर का ठेवलं?”, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
हे वाचलं का?
जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार : “हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न”
“प्रकरण दाबण्याचा हा प्रयत्न आहे. एखादा व्यक्ती मानसिक रुग्ण आहे; तर त्याच्या हातात रायफल दिली जाते का? मानसिक रुग्ण हा वादविवाद घालू शकतो का? आणि मानसिक रुग्ण वेगवेगळ्या कम्पार्टमेंटमध्ये जाऊन निवडून माणसं मारतो का ? याची उत्तर कोण देणार”, अशी प्रश्नांची सरबत्तीच जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.
चेतन सिंह ह्याने जो काल गोळीबार केला; त्यामध्ये आचार्य नावाच्या त्याच्या सहकार्याने दिलेल्या जबाबामध्ये त्याने टिकाराम यांच्याशी वादविवाद केल्याचे सांगितले. हे सगळं जवळ-जवळ अर्धा तास चालू होतं. त्याची मानसिक स्थिती बरोबर नाही. असं पोलिसांनी मा. न्यायालयामध्ये सांगितलं. हे कशावरुन…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 1, 2023
ADVERTISEMENT
गोळीबारानंतरचा चेतन सिंहचा व्हिडीओ हादरवून टाकणारा
मुंबईकडे येत असलेल्या जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने वापी स्टेशन सोडल्यानंतर आरपीएफ जवान चेतन सिंहने अंदाधूंद गोळीबार केला. चार जणांची हत्या केल्यानंतर चेतन सिंहचा एक व्हिडीओ समोर आला. यात तो म्हणतो की, ‘इन्ही लोगोंने मारा… पाकिस्तान से ऑपरेट हुआ था… यही मीडिया कव्हरेज दिखा रही थी. पता चल रहा है. हिंदुस्थान मैं रहना है तो, मोदी और योगी दो है. और आप के ठाकरे है.”
ADVERTISEMENT
वाचा >> PM Modi in Pune : ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’, राज ठाकरेंचे नरेंद्र मोदींना फटकारे!
चेतन सिंहच्या या विधानामुळेच त्याने तीन जणांची हत्या का केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ आरपीएफ अधिकारी टिकाराम मीना यांच्यासह इतर तीन प्रवाशांना चेतन सिंहने वेगवेगळ्या बोगीमध्ये जाऊन मारले. त्याने ही हत्या का केली, याचे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही. तो चौकशीत सहकार्य करत नसल्याचेही पोलिसांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT