मुंबईची खबर : लोकलमध्ये महिलांना गुलाबाची फुलं का वाटली गेली? रेल्वे प्रशासनाने काय सांगितलं?

मुंबई तक

मुंबई लोकलमध्ये महिलांना गुलाबाची फुलं वाटण्यात आली. ही गुलाबाची फुलं का वाटली गेली असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर यामागे एक खास कारण आहे.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : लोकलमध्ये महिलांना गुलाबाची फुलं का वाटली गेली?

point

रेल्वे प्रशासनाने काय सांगितलं?

Mumbai News : मुंबईच्या पश्चिम रेल्वेतर्फे लोकलमध्ये 5 मे रोजी महिलांना गुलाबाची फुलं वाटण्यात आली. ही गुलाबाची फुलं का वाटली गेली असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर यामागे एक खास कारण आहे. 5 मे हा दिवस रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. 5 मे 1992 रोजी जगातील पहिली केवळ महिलांसाठी असलेली ही विशेष लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. या ऐतिहासिक प्रवासाला 34 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रेल्वे प्रशासनाने आनंद व्यक्त केला असून, ही सेवा मुंबईच्या उपनगरीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते.

गुलाबाची फुले देऊन स्वागत

या खास प्रसंगाचे सेलिब्रेशन करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचारी वर्गाने सायंकाळी 5:39 च्या लेडीज स्पेशल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांना गुलाबाची फुले देऊन त्यांचे स्वागत केले. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या अधिकृत 'X' खात्यावरून या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे कर्मचारी महिलांना गुलाब देत असताना आणि महिला प्रवासी आनंदाने प्रतिसाद देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक महिलांनी या प्रवासादरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांसोबत छायाचित्रेही काढली.

हे ही वाचा : दहावीचा निकाल जाहीर, पाहा किती टक्के लागला Result.. 'इथे' पाहा थेट मार्कशीट!

हजारो महिलांच्या दैनंदिन जीवनाचा भाग

पश्चिम रेल्वेने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या तीन दशकांपासून ही सेवा महिला प्रवाशांना सुरक्षित आणि समर्पित प्रवासाची सुविधा देऊन त्यांचे सक्षमीकरण करत आहे. मुंबईच्या गजबजलेल्या उपनगरीय रेल्वे जाळ्यामध्ये महिलांना अधिक सोयीस्कर आणि निर्धोक प्रवास मिळावा या उद्देशाने ही सेवा सुरू करण्यात आली होती. आज ही लोकल हजारो महिलांच्या दैनंदिन जीवनाचा आणि प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनली आहे.

हे ही वाचा : समजून घ्या: सत्ता स्थापनेवेळी बहुमत सिद्ध करायला राज्यपाल सांगू शकतात? विजयची अडवणूक योग्य की अयोग्य?

जागतिक रेल्वे इतिहासातील महत्त्वाचा दिवस

मुंबई महानगर क्षेत्रातील हजारो नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ही 'लेडीज स्पेशल' सेवा म्हणजे एक वरदान ठरली आहे. 34 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील रेल्वे इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या आगळ्यावेगळ्या शुभेच्छांमुळे महिला प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले, ज्यामुळे हा वर्धापन दिन अधिकच संस्मरणीय ठरला.
 

हे वाचलं का?