SambhajiRaje: ‘चक्की पिसिंग…’ देवेंद्र फडणवीसांना संभाजीराजेंनीही डिवचलं!

ADVERTISEMENT

sambhaji raje chhatrapati hits out at devendra fadnavis after ajit pawar joined Shiv sena bjp alliance
sambhaji raje chhatrapati hits out at devendra fadnavis after ajit pawar joined Shiv sena bjp alliance
social share
google news

मुंबई: माजी खासदार संभाजी राजे छत्रपती (sambhaji raje chhatrapati) यांनी सांगोला येथे झालेल्या सभेत भाजप, (BJP) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) जोरदार टीका केली आहे. राजकीय नेत्यांच्या भूमिकेमुळे जनता अस्वस्थ आहे. म्हणत संभाजीराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची खिल्ली उडवली आहे. (sambhaji raje chhatrapati has criticized devendra fadnavis shahaji bapu and mp nimbalkar maharashtra politics latest)

‘राष्ट्रवादी म्हणायची आम्ही पुरोगामी विचाराचे लोक आहोत. जातीयवादी पक्षांसोबत जाणार नाही. तर भाजपचे नेते म्हणायचे, नाही नाही नाही.. आम्ही राष्ट्रवादीसोबत कदापिही युती करणार नाही. वर केंद्रात मोठमोठी भाषणं करतात. मात्र राज्यातही तेच बोलतात. चक्की पिसिंग पिसिंग…’ असं म्हणत संभाजीराजेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

हे ही वाचा >> Titwala crime news : पत्नीने घोटला गळा, अन्…; पोस्टमार्टेम रिपोर्टमुळे फुटलं बिंग

दुसरकीडे गुवाहटीची आठवण करून देत नाव न घेत शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचाही समाचार घेतला. संभाजी राजे म्हणाले ‘आमदारांनी सर्वात जास्त टीका पवार कुटुंबावर केली. अजितदादा, शरद पवार यांच्यावर टीका केली. आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसावे लागत आहे. निधी मिळत नाही म्हणून हे सत्तेबाहेर पडले. आता त्याच नेत्याकडे अर्थ खातं गेलं.’ असं म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना संभाजीराजेंनी चिमटा काढला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी संभाजीराजेंनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील समस्यांवरही भाष्य केलं. ‘माझी खासदारांना सूचना आहे की, त्यांनी किसान रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे आग्रह धरावा. 37 देशात सांगोल्यातील डाळिंब जाते. मात्र किसान रेल्वे बंद असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मी सांगोल्यात सर्व ठिकाणी फिरलो. आता येथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे. येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचं साम्राज्य आहे. इथे रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत. त्याचे पुरावे मी स्वतः देईन.’ अशी टीकाही संभाजीराजे यांनी यावेळी केली आहे.

हे ही वाचा >> No confidence : राहुल गांधींना खासदारकी मिळाली, टेन्शन PM मोदींचं वाढलं?

‘स्वराज्य पक्ष 2024 ला वेगळा पर्याय म्हणून उभा राहील.’, असा दावाही संभाजीराजे यांनी केला. ‘मी कोणावर वैयक्तिक टीका करणार नाही. गुवाहाटीबद्दल काही बोलणार नाही. गेल्या 75 वर्षात महाराष्ट्रातील राजकारण एवढ्या खालच्या पातळीला कधीच गेले नव्हते.’ असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT